मार्कंड्यात लाखो शिवभक्तांचा कुंभमेळा
By Admin | Updated: March 8, 2016 01:19 IST2016-03-08T01:19:11+5:302016-03-08T01:19:11+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथील श्री मार्कंडेश्वराच्या यात्रेस ७ मार्चर् सोमवारपासून

मार्कंड्यात लाखो शिवभक्तांचा कुंभमेळा
मार्कंडा : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथील श्री मार्कंडेश्वराच्या यात्रेस ७ मार्चर् सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. यात्रेनिमित्त मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी व पूजन करण्यासाठी यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी विदर्भासह लगतच्या आंध्रप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक दाखल झाले. यात्रेनिमित्त मार्कंडा येथे लाखो शिवभक्तांचा जनसागर उसळला. यंदा पहिल्यांदाच पहिल्याच दिवशी दोन लाख भाविकांनी मार्कंडा यात्रेला हजेरी लावून मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले.
राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते जत्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे ५ वाजताच्या सुमारास श्री मार्र्कंडेश्वराची महापूजा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासह पंकज पांडे, शुभांगी पांडे, राजमाता राणी रूक्मिणीदेवी, कुमार अवधेशरावबाबा, मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्युंजय गायकवाड, सहसचिव रामू तिवाडे, कोषाध्यक्ष पा. गो. पांडे, अहेरीचे नगरसेवक अमोल मुक्कावार, रामप्रसाद धर्मशाळेचे सचिव केशव आंबटवार, पोलीस निरिक्षक किरण अवचर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनीही मार्र्कंडेश्वराच्या मुख्य गाभाऱ्यात शिवलिंगाची पूजा केली. यावेळी रवींद्र ओल्लालवार, किशोर ओल्लालवार, उज्वल गायकवाड, प्रा. राजेश कात्रटवार, डॉ. भारत खटी, तहसीलदार उमाकांत वैद्य, बीडीओ बादलशहा मडावी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, आनंद गण्यारपवार, नगरसेवक गिरीष मद्देर्लावार, रोषनी वरघंटे, स्वप्नील वरघंटे आदी उपस्थित होते.
दुपारी ११ वाजताच्या सुमारास केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेतले. त्यांच्या समावेत आमदार देवराव होळी हजर होते. यावेळी मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने गंगाधर कोंडुकवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार सचिव मृत्यूंजय गायकवाड, रामू तिवाडे, उज्वल गायकवाड आदी उपस्थित होते. सोमवारला मार्र्कंडेश्वराच्या मुख्य मंदिरापासून एक किमी अंतरापर्यंत भाविकांची प्रचंड रांग लागली होती. हर हर महादेवच्या घोषणेने मार्र्कंडा नगरी दुमदुमली.
वैनगंगेच्या तीरावरही जीवरक्षक तैनात
४यात्रेदरम्यान प्रशासनाच्या वतीने नदी पात्रात जीवरक्षक बोटीची व्यवस्था करण्यात आली असून पाच जणांचा समावेश असलेली बचाव टीमही तैनात करण्यात आली आहे. यासोबतच अग्नीशामक दल, विशेष कृती दलाची पथके तैनात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने येथे २४ तास आरोग्य सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी १५ ठिकाणी नळाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष महिला पोलीस पथक तैनात करण्यात आले असून सदर पथक यात्रेवर २४ तास नजर ठेवून आहे.
ग्रा.पं.तर्फे अशी आहे व्यवस्था
४मार्र्कंडादेव ग्रामपंचायतीच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात चेंचींग रूम, सुलभ शौचालय, २० मूत्रीघर व विद्युतीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिनेश सराटे यांच्या पुढाकारातून यात्रेकरूंसाठी २४ तास पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते लौकीक भिवापुरे, चामोर्शीचे नगरसेवक वैभव भिवापुरे यांच्या मार्फत पॉकेटबंद पाण्याची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली आहे.