जिल्हाभरात महावितरणमार्फत मीटर तपासणी माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 05:00 AM2021-11-10T05:00:00+5:302021-11-10T05:00:34+5:30

वीज बिल भरण्याच्या घरबसल्या सुविधा उपलब्ध असतानाही अनेक ग्राहकांनी ऑक्टोबर २०२० पासून ऑक्टोबर २०२१ या १२ महिन्यांत वीज बिल भरलेले नाही. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक आहे. सध्या महावितरण आर्थिक बिकट परिस्थितीला सामोरे जात आहे. वीजग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल वेळेवर स्वतःहून भरणे अपेक्षित आहे. तरीही महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना थकबाकी वसुलीकरिता ग्राहकांच्या दारापर्यंत जावे लागत आहे.

Meter inspection campaign by MSEDCL across the district | जिल्हाभरात महावितरणमार्फत मीटर तपासणी माेहीम

जिल्हाभरात महावितरणमार्फत मीटर तपासणी माेहीम

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदार ग्राहकांकडून वीज बिल वसुली, वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. तसेच संशयास्पद वीजवापर ज्यात १ ते ३० युनिट वीजवापर व शून्य वीजवापर असणारे ग्राहक तसेच वीजवापराच्या प्रमाणात वीज बिल न येणाऱ्या ग्राहकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या ४० दिवसांत  १९ हजार २१२ ग्राहकांचा वीजपुरवठा  २७ कोटी ६५ लाखांच्या थकबाकीसाठी खंडित करण्यात आला. १८० वीजचोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.   
वीज बिल भरण्याच्या घरबसल्या सुविधा उपलब्ध असतानाही अनेक ग्राहकांनी ऑक्टोबर २०२० पासून ऑक्टोबर २०२१ या १२ महिन्यांत वीज बिल भरलेले नाही. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक आहे. सध्या महावितरण आर्थिक बिकट परिस्थितीला सामोरे जात आहे. वीजग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल वेळेवर स्वतःहून भरणे अपेक्षित आहे. तरीही महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना थकबाकी वसुलीकरिता ग्राहकांच्या दारापर्यंत जावे लागत आहे. ही मोहीम पुढे अशीच धडकपणे राबविण्यात येणार असून, महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी महावितरणच्या अस्तित्वासाठी मैदानात उतरले आहेत.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, इतर लघुदाब, पाणीपुरवठा योजना, कृषिपंपधारक व पथदिवे या ग्राहकांकडे ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकूण थकबाकी ४२१ कोटी  झाली आहे. ती मागील वर्षाची ९९ कोटी ३३ लाख येणे आहेच. कृषिपंपधारकांसाठी नवीन कृषी ऊर्जा धोरणामधून थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणद्वारा करण्यात येत आहे. थकबाकीसाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक,  सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहक अशा एकूण १९ हजार २१२  वीज ग्राहकांचा वीजपुरवठा ऑक्टोबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ कालावधीत (आतापर्यंत) खंडित करण्यात आला. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित  झाल्यावर वीजनियामक आयोगाच्या निर्देषानुसार नियमाप्रमाणे पुनर्जोडणी शुल्क आकारण्यात येत आहे.

९३० मीटर संथगतीने फिरताना आढळले

आतापर्यंत १ ते ३० युनिट वीजवापर असलेल्या ५८ हजार ८५५ ग्राहकांचा वीजवापर तपासण्यात आला आहे. त्यात ९३० वीजग्राहकांचे वीजमीटर संथगतीने फिरताना आढळले. शून्य वापर असलेल्या ९ हजार १३३ ग्राहकांपैकी ५ हजार ८३१ ग्राहकांचा वीजवापर व वीजमीटर तपासण्यात आले. त्यात १३९ वीजमीटर संथ, तर १४० मीटर बंद आढळले. या विशेष मोहिमेत १८० ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचे उघडकीस आले.

थकबाकीदारांना वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना पर्यावरणपूरक ऑनलाईन पेमेंट, मोबाईल ॲप, गुगल पे, पेटीएम यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नियमित ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगल्याप्रकारे लाभत आहे. वीजग्राहकांनी  वीज बिलांचा भरणा करून सहकार्य करावे.  
- सुनील देशपांडे, 
मुख्य अभियंता, महावितरण

 

Web Title: Meter inspection campaign by MSEDCL across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.