A message of peace from the rally | रॅलीतून दिला शांततेचा संदेश
रॅलीतून दिला शांततेचा संदेश

ठळक मुद्देदुर्गम भागात नक्षलविरोधी रॅली : आदिवासी विकास सप्ताह उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान आदिवासी विकास सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे आयोजन करून पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक, महिला व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
‘नक्षलवाद हटाव, नक्षलवाद मुर्दाबाद’, अशी घोषणाबाजी सहभागी नागरिकांनी केली. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी नक्षलवाद्यांच्या विरोधात जनजागृती करणे आवश्यक आहे, तसा प्रयत्नही जिल्हा पोलीस दलाकडून सुरू आहे. पेंढरी उपविभागाच्या परिसरात नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली. यावेळी आबालवृद्धांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मुखवटा तोंडाला लावून ‘हिंसा नको, अहिंसा हवी’ असा संदेश दिला. अहेरी उपविभागातील मरपल्ली, जिमलगट्टा, आसरअल्ली या दुर्गम भागात नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जवळपास चार ते पाच हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला.
अहेरी उपविभागात पाऊस सुरू असताना सुद्धा नागरिकांनी पावसाची पर्वा न करता विकासासाठी एकत्र येत रॅलीच्या माध्यमातून शांततेचा संदेश दिला. शांतता रॅलीमधून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली, असे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले आहे.


Web Title: A message of peace from the rally
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.