जिमलगट्टा येथे पोलिसांनी उभारले स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:12 IST2017-11-20T00:12:14+5:302017-11-20T00:12:29+5:30
जिमलगट्टा येथील विठा कारे कुळमेथे यांची नक्षल्यांनी जिमलगट्टा येथील आठवडी बाजारात २० एप्रिल २०१४ रोजी भर दुपारी हत्या केली.

जिमलगट्टा येथे पोलिसांनी उभारले स्मारक
आॅनलाईन लोकमत
जिमलगट्टा : जिमलगट्टा येथील विठा कारे कुळमेथे यांची नक्षल्यांनी जिमलगट्टा येथील आठवडी बाजारात २० एप्रिल २०१४ रोजी भर दुपारी हत्या केली. पोलीस प्रशासनाने विठा कुळमेथे याचे स्मारक बांधून त्याला श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी साईनाथ सुरवसे, पोलीस उपनिरिक्षक सचिन निंबाळकर, साईप्रसाद केंद्रे, अभिजित भोसले, सरपंच सरीता गावडे, उपसरपंच मदना नैताम यांच्यासह जिमलगट्टा येथील प्रतिष्ठीत नागरिक व उपपोलीस स्टेशनचे जवान उपस्थित होते. विठा कुळमेथे हे पोलिसांचा खबºया असल्याचा संशय व्यक्त करून नक्षल्यांनी त्याला ठार मारले. पोलिसांच्या या कार्याचे जिमलगट्टा येथील नागरिकांनी कौतुक केले आहे.