खासदारांनी केली जखमींची विचारपूस
By Admin | Updated: February 3, 2016 01:29 IST2016-02-03T01:29:38+5:302016-02-03T01:29:38+5:30
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मोहगाव येथे वऱ्हाड्यांना घेऊन जाणारे मेटॅडोर

खासदारांनी केली जखमींची विचारपूस
जिल्हा रूग्णालयाला भेट : योग्य उपचार करण्याच्या दिल्या सूचना
गडचिरोली : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मोहगाव येथे वऱ्हाड्यांना घेऊन जाणारे मेटॅडोर वाहन उलटल्याने ४१ वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना कुरखेडा-कोरची मार्गावरील डोंगरगाव फाट्यानजीक बेडगावघाटाच्या पायथ्याशी सोमवारी घडली. या अपघातातील गंभीर १७ रूग्णांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. खासदार अशोक नेते यांनी मंगळवारी जिल्हा रूग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली व त्यांची आस्थेने विचारपूस केली.
याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा सचिव डॉ. भारत खटी, कुरखेडा तालुकाध्यक्ष रामभाऊ लांजेवार, आरमोरीचे तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, देशमुख व भाजपाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांना अपघातातील जखमींवर योग्य औषधोपचार करण्याच्या सूचना केल्या. (स्थानिक प्रतिनिधी)