घरकुलांच्या समस्यांबाबत गावपातळीवर सभा
By Admin | Updated: May 9, 2015 01:49 IST2015-05-09T01:49:17+5:302015-05-09T01:49:17+5:30
इंदिरा आवास योजनेंतर्गत अनेक घरकुलांचे बांधकाम अपूर्ण आहे.

घरकुलांच्या समस्यांबाबत गावपातळीवर सभा
अहेरी : इंदिरा आवास योजनेंतर्गत अनेक घरकुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. या समस्या जाणून घेण्यासाठी अहेरी पंचायत समितीच्या वतीने गावपातळीवर सभांचे आयोजन करून समस्या निकाली काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या.
इंदिरा आवास योजनेंतर्गत दरवर्षी हजारो घरकूल मंजूर करण्यात येतात. मात्र यातील अर्धेही घरकूल वर्षाचा कालावधी उलटूनही पूर्ण होत नाही. काही घरकूल तीन ते चार वर्षांपर्यंत पूर्ण होत नाही. यासाठी दिले जाणारे अनुदान उपलब्ध होत असतानाही घरकुलाचे बांधकाम वेळेवर होत नाही. हे न उलगडणारे कोडे आहे. घरकूल लाभार्थ्यांच्या प्रत्येक्ष समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने अहेरीचे संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर यांच्या मार्गदर्शनात देवलमरी येथे ५ मे रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला आवलमरी, वट्रा, इंदाराम येथील नागरिक उपस्थित होते. अहेरी येथील सभेला वांगेपल्ली, चिंचगुंडी, व्यंकटरावपेठा येथील लाभार्थी उपस्थित होते. ६ मे रोजी आलापल्ली येथे सभा आयोजित करण्यात आली. येथील सभेला नागेपल्ली, वेलगूर, किष्टापूर (वेल) येथील नागरिक उपस्थित होते. पेरमिली येथील सभेला येरमनार, येडमपल्ली, कुरूमपल्ली, आरेंदा येथील नागरिक उपस्थित होते.
जिमलगट्टा येथे ७ मे रोजी सभा घेण्यात आली. या सभेला पेठा, देचली, कांजेर, किष्टापूर (दौंड), उमानूर, गोविंदगाव, मरपल्ली, रेगुलवाही येथील नागरिक उपस्थित होते. कमलापूर येथील सभेला मांड्रा, कमलापूर, रेपनपल्लीचे लाभार्थी उपस्थित होते. ८ मे रोजी खमनचेरू येथे सभा आयोजित केली. या सभेला महागाव (बुज), महागाव (खुर्द), बोरी, राजपूर (पॅच) येथील लाभार्थी उपस्थित होते. राजामपूर येथील सभेला राजराम खांदला, तिमरथ येथील लाभार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)