मूलचेरा तालुका ग्रामसभा महासंघाची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST2021-01-13T05:36:27+5:302021-01-13T05:36:27+5:30
मूलचेरा : तालुक्यातील ग्रामसभा महासंघाची सभा स्थानिक बिरसा मुंडा चौकामध्ये इलाखा कमिटी पदाधिकारी, ग्रामसभा सदस्य, भूमिया, गाव पाटील,पुजारी ...

मूलचेरा तालुका ग्रामसभा महासंघाची सभा
मूलचेरा : तालुक्यातील ग्रामसभा महासंघाची सभा स्थानिक बिरसा मुंडा चौकामध्ये इलाखा कमिटी पदाधिकारी, ग्रामसभा सदस्य, भूमिया, गाव पाटील,पुजारी तथा गावकरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. तालुका ग्रामसभा महासंघाचे पुनर्गठन करण्यात आले,
जिल्हा ग्रामसभा महासंघाकरिता दोन महिला व तीन पुरुषाची निवड करायची होती. त्यापैकी सुनिता कुसनाके, अरविंद मडावी, गीताताई पल्लो याची निवड जिल्हा ग्रामसभा महासंघावर सदस्य म्हणून करण्यात आली. यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून गणेश तलांडे, तालुका महाग्रामसभा अध्यक्ष दिलीप आत्राम, ग्रामसभेचे उपाध्यक्ष केसरी तेलामी, सचिव आनंद सिडाम, माजी नगराध्यक्ष सुभाष आत्राम, गणपत मडावी, आदिवासी विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव आलाम, पोलीस पाटील उषा पेंदाम,रमेश कुसनाके, दीपक परचाके, वासुदेव मडावी,बंडू आलाम,मधुकर परचाके,चंद्रकांत मडावी, हनुमंतु वेलादी तसेच तालुक्यातील गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.