लोहार समाजाच्या सभेत अनेक ठराव पारित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 01:46 IST2017-03-01T01:45:35+5:302017-03-01T01:46:06+5:30
लोहार समाजातर्फे गडचिरोली येथे २६ मार्च रोजी विश्वकर्मा जयंतीचा कार्यक्रम आयोजित करणे,

लोहार समाजाच्या सभेत अनेक ठराव पारित
गडचिरोली : लोहार समाजातर्फे गडचिरोली येथे २६ मार्च रोजी विश्वकर्मा जयंतीचा कार्यक्रम आयोजित करणे, समाजातील इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक व पालिकेतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणे तसेच लोहार समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा घेणे आदी ठराव सोमवारी झालेल्या सहविचार सभेत घेण्यात आले.
महाराष्ट्र राज्य लोहार व तत्सम समाज संघ गडचिरोलीची सहविचार सभा जंगल कामगार सोसायटीच्या सभागृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी दामोधर बागडे होते. यावेळी मंचावर चंद्रभान गेडाम, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश मांडवगडे, कार्याध्यक्ष धर्मदास नैताम, अशोक मेश्राम, कुरवलाल उईके, सुधाकर पेटकर, प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
समाजातर्फे विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरूष आयोजन समिती तसेच महिला आयोजन समिती यावेळी गठित करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक सुरेश मांडवगडे, संचालन संजय मडावी यांनी केले तर आभार शालिकराम बावणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी नरेश केळझरकर, श्रीराम सोनटक्के, रमेश सहारे, दिवाकर हजारे, रेमाजी बावणे, आनंदराव बावणे, वसंत ठमके, भास्कर हजारे, प्रभू वक्केवार, विश्वनाथ मेश्राम, भोजराज बागडे, सुभद्रा गेडाम, लीला मेश्राम, शालिकराम बावणे, एकनाथ कोसरे, सुनीता घुघुस्कर, विजय आत्राम, मारोती चंदनखेडे, सचिन मांडवगडे आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)