११६ पोलीस अधिकारी व जवानांना महासंचालकांचे पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 05:00 AM2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:00:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पोलीस दलात उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्टÑ दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक ...

Medal of Director General to 116 police officers and jawans | ११६ पोलीस अधिकारी व जवानांना महासंचालकांचे पदक

११६ पोलीस अधिकारी व जवानांना महासंचालकांचे पदक

Next
ठळक मुद्देनक्षलग्रस्त भागात केलेल्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान : जिल्हा व अपर पोलीस अधीक्षकांचाही सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोलीस दलात उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्टÑ दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानित केले जाते. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील ११६ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग आणि अजयकुमार बन्सल यांचा समावेश आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गडचिरोली पोलीस दलाने पोलीस महासंचालक पदकाच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. गडचिरोली पोलीस दलाने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पाडल्या.
वर्षभरात जहाल नक्षलवादी नर्मला हिच्यासह २२ नक्षलवाद्यांना अटक केली. जहाल नक्षलवादी विलास कोला याने एके-४७ या रायफलसह आत्मसमर्पण केले. वर्षभरात ९ नक्षलवाद्यांचा खात्मा पोलीस दलाने केला. अशा विविध कामगिरीचा विचार करून पोलीस महासंचालक पदाने त्यांना गौरविले जाणार आहे.
पदक जाहीर झालेल्यांमध्ये एपीआय शंकर बिराजदार, पीएसआय प्रदीप तुंबे, सुरज सुसतकर, संकेत शिंदे, ज्ञानेश्वर झोल, स्वप्नील गोपाले, वैभव रनखंब, धनराज काळे, योगीराज जाधव, वैभव पाटील, महेश कुमार, कल्पेश खारोडे, एसआय पुरूषोत्तम नारनवरे यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर वरिल अधिकाऱ्यांशिवाय ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३ सहायक पोलीस निरीक्षक, २१ पोलीस उपनिरीक्षक, ७ सहायक फौजदार आणि ७८ पोलीस जवानांचा समावेश आहे.

Web Title: Medal of Director General to 116 police officers and jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस