जाळून घेऊन विवाहित महिलेची आत्महत्या

By Admin | Updated: July 4, 2016 01:02 IST2016-07-04T01:02:25+5:302016-07-04T01:02:25+5:30

घरी कुणीही नसल्याची संधी साधून येथील एका विवाहित महिलेने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना

Married woman commits suicide | जाळून घेऊन विवाहित महिलेची आत्महत्या

जाळून घेऊन विवाहित महिलेची आत्महत्या

वैरागड : घरी कुणीही नसल्याची संधी साधून येथील एका विवाहित महिलेने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
रूपाली रूपेंद्र वासनिक (३०) रा. वैरागड असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी विवाहित महिला रूपाली वासनिक हिच्या दोन्ही मुली शाळेत गेल्या होत्या. पती बाहेर गेले होते. यावेळी रूपालीने स्वत:ला जाळून घेतले. यात ती ८० टक्के जळाली. कुटुंबियांनी जळालेल्या अवस्थेत असलेल्या रूपाालीला वैरागडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथून गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र शनिवारी दुपारी उपचारादरम्यान रूपालीचा मृत्यू झाला. या संदर्भात गडचिरोली पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Married woman commits suicide