पोलिसांच्या सहकार्याने विवाह

By Admin | Updated: December 16, 2015 01:39 IST2015-12-16T01:39:08+5:302015-12-16T01:39:08+5:30

पोलीस विभागाच्या वतीने धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.

Marriage with the help of police | पोलिसांच्या सहकार्याने विवाह

पोलिसांच्या सहकार्याने विवाह

पोलिसांच्या सहकार्याने विवाह : पोलीस विभागाच्या वतीने धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या मेळाव्यादरम्यान विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्याचबरोबर सामूहिक विवाह सोहळासुध्दा पार पडला. या विवाह सोहळ्यादरम्यान सिंदेसूर येथील चार जोडपी विवाहबध्द झाली. त्यांना भेट वस्तू प्रदान करताना पोलीस अधिकारी.
मुरूमगाव येथे सामूहिक विवाह सोहळा
मुरूमगाव : जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस मदत केंद्र मुरूमगावच्या वतीने मुरूमगाव येथे मंगळवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान सामूहिक सोहळासुद्धा आयोजित करण्यात आला. सामूहिक विवाह सोहळ्यात सिंदेसूर येथील चार जोडपी विवाहबद्ध झाली. त्यांना पोलीस प्रशासनातर्फे जीवनोपयोगी भेटवस्तू भेट देण्यात आल्या. मेळाव्याचे उद्घाटन राजे रघुवीरशहा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी एसआरपीएफचे पोलीस निरीक्षक काशिनाथ तीर्थकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सदस्य जयलाल मार्गिया, सरपंच शेवंता हलामी, प्रियंका कुंजाम, चावनशाह महाराज, डॉ. मनीषा गोशेट्टीवार, मुख्याध्यापक चित्ररेखा खोब्रागडे, वनपाल सी. एच. बनपूरकर, वसंत कोलियारा, धुर्वे, कवलिया, बखर, बी. जे. मेश्राम, बी. जी. सोमनकर, जी. जे. चिंचोलकर, प्रा. ओम देशमुख, पीएसआय दानिश मंसुरी, स्वप्नील जांबरे, स्वप्नील जामरे, स्वप्नील गडवे उपस्थित होते. जनजागरण मेळाव्यातील स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचेही वितरण करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Marriage with the help of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.