बाजार समितीवर राकाँचे वर्चस्व
By Admin | Updated: December 26, 2016 01:27 IST2016-12-26T01:27:04+5:302016-12-26T01:27:04+5:30
अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी २४ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.

बाजार समितीवर राकाँचे वर्चस्व
अहेरीत आठ जागा बळकावल्या : आविसला सात जागा
अहेरी : अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी २४ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. रविवारी २५ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार विजयी झाले. आविसंचे अजय कंकडालवार यांच्या गटाचे सात उमेदवार तर भारतीय जनता पार्टीच्या दोन उमेदवारास यश मिळाले आहे. एका जागेवर अपक्षाला विजय मिळविता आला.
शनिवारी झालेल्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी, सहकार या तिन्ही मतदारसंघातून ५७४ मतदारांपैकी ४५२ मतदारांनी मतदान केले होते. अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होउन सिरोंचा व अहेरी बाजार समिती वेगवेगळ्या झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ३५१ मतदारांपैकी २४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर व्यापारी मतदासंघातून ३९ पैकी ३४ जणांनी मतदान केले होते. सहकारी क्षेत्र संघातून १८४ पैकी १७५ मतदारांनी मतदान केले होते .
विजयी उमेदवारांमध्ये सहकारी संस्था मतदार संघातून रवींद्र भागवंतराव आत्राम यांना १५४ मते मिळाली. सत्यनारायण वेंकटी एग्लोपवर यांना १४०, मदना नानाजी कोडापा यांना १३८, केशव कुल्ले कंगाली यांना १४६, मारोती लचमा दहागावकर यांना १४९, भीमा मुत्ता पेंदाम यांना १३३, नरंगो चैतू उसेंडी यांना १३३ मते मिळाली. सर्वसाधारण ग्रामपंचायत गटातून वैभव रामन्ना कंकडालवार यांना २६७, निर्मला अशोक येलमुले यांना २५०, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून रमेश शामराव वैरागडे यांना २७९ मते मिळाली. सहकारी संस्था महिला राखीव गटातून निर्मला अशोक मडावी यांना १५६, सोमी गोसावी सिडाम यांना १५२, विमुक्त जाती/ भटक्या जमाती गटातून मरम्मा संपत पोचम यांना १६६ मते मिळाली. व्यापारी- अडते गटातून विनोद वेंकटेश अंकनपल्लीवार यांना ३४, प्रशांत सुधाकर पत्तीवार यांना ३२, अनुसुचीत जाती/जमाती गटातून गजानन सिडाम यांना २८४ मते मिळाली. इतर मागासवर्गीय गटातून अजय रामन्ना कंकडालवार हे अविरोध निवडून आले. हमाल गटातून सेनवाज महेबूब शेख हे विरोध निवडून आले. (शहर प्रतिनिधी)