बाजार समिती उमेदवारांचे सोमवारी ठरणार भाग्य
By Admin | Updated: September 14, 2015 01:16 IST2015-09-14T01:16:42+5:302015-09-14T01:16:42+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोमवारी होणार असून या निवडणुकीत उभे असलेल्या ३६ उमेदवारांचे भाग्य ठरणार आहे.

बाजार समिती उमेदवारांचे सोमवारी ठरणार भाग्य
मतदान : चामोर्शी बाजार समिती निवडणूक
चामोर्शी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोमवारी होणार असून या निवडणुकीत उभे असलेल्या ३६ उमेदवारांचे भाग्य ठरणार आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा जिल्ह्यात लौकीक आहेत. चार उमेदवार अविरोध निवडून आले असून उर्वरित १४ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. सेवा सहकारी मतदार संघातून ११ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी ५५६ मतदार मतदान करणार आहेत. ग्रामपंचायत मतदार संघाच्या चार जागा आहेत. त्यापैकी एक जागा अविरोध निवडून आली आहे. उर्वरित तीन जागांसाठी मतदान होणार आहे. या मतदार संघात एकूण ७८५ मतदार आहेत. हमाल मतदार संघातून एक जागा आहे. या मतदार संघात एकूण २०० मतदार मतदान करणार आहेत. सेवा सहकारी क्षेत्रातून सर्वाधिक जागा असल्याने दोन्ही पॅनलनी याच मतदार संघाकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार व माजी सभापती त्रियुगी दुबे यांचे चिरंजीव धर्मेंद्र दुबे यांनी स्वत: उमेदवारी घेऊन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस व रंगत आणखी वाढली असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)