मार्कंडेश्वराच्या जीर्णाेद्धाराच्या कामाला गती येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST2021-01-13T05:34:47+5:302021-01-13T05:34:47+5:30

गडचिराेली : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामाेर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने २ ...

Markandeshwar's restoration work will be accelerated | मार्कंडेश्वराच्या जीर्णाेद्धाराच्या कामाला गती येणार

मार्कंडेश्वराच्या जीर्णाेद्धाराच्या कामाला गती येणार

गडचिराेली : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामाेर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने २ काेटी रुपयांचा निधी मंजूर केला हाेता. निधीच्या अनियमिततेमुळे हे काम अतिशय संथगतीने सुरू हाेते. दरम्यान खा. अशाेक नेते यांच्या पाठपुराव्याने मंजूर व थकीत असलेला १ काेटीचा निधी तातडीने मिळणार आहे. त्यामुळे या मंदिराच्या जीर्णाेद्धाराच्या कामास गती येणार आहे. खा. अशाेक नेते यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाचे महानिदेशक विद्यावती यांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांच्याशी मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णाेद्धाराच्या कामाबाबत चर्चा केली. काेराेना महामारीच्या लाॅकडाऊनमुळे मंदिराचे काम रखडले हाेते. निधी थकीत असल्याने कामात वारंवार अडथळे येत आहेत, असे निदर्शनास आणून दिले. दरम्यान उर्वरित १ काेटी रुपयांचा निधी तातडीने आवंटित करण्याचे निर्देश महानिदेशक विद्यावती यांनी राज्य पुरातत्त्व विभागाला दिले. तसेच मंदिर जीर्णाेद्धाराच्या कामात निधीमुळे व्यत्यय येणार नाही, अशी हमी दिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी अक्षय उईके उपस्थित हाेते.

Web Title: Markandeshwar's restoration work will be accelerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.