मार्कंडेश्वर देवस्थानाच्या डागडुजी कामाला वेग

By Admin | Updated: February 5, 2016 00:59 IST2016-02-05T00:59:36+5:302016-02-05T00:59:36+5:30

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर देवस्थानच्या डागडुजी कामाला पुरातत्व विभागाकडून सुरूवात करण्यात आली आहे.

Markandeshwar Devasthan's repair work | मार्कंडेश्वर देवस्थानाच्या डागडुजी कामाला वेग

मार्कंडेश्वर देवस्थानाच्या डागडुजी कामाला वेग

पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात कार्य सुरू : राजस्थान, भोपाळचे कारागीर भिडले
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर देवस्थानच्या डागडुजी कामाला पुरातत्व विभागाकडून सुरूवात करण्यात आली आहे.
सदर प्राचीन मंदिरात आतील गाभाऱ्यातील दरवाजाजवळचे दगड निखळत होते. त्याला भेगा पडल्या होत्या. त्यामुळे पावसात गाभाऱ्यात पाणी झिरपत होते. मंदिरात पडणाऱ्या पाण्यामुळे भाविकांना ओलेचिंंब होऊन दर्शन घ्यावे लागे. पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होते. अखेरीस आता दोन महिन्यांपूर्वी सदर मंदिराच्या डागडुजी कामाला सुरूवात करण्यात आली आहे. अधीक्षक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपूर यांच्या वतीने सहायक कन्झर्वेशन असिस्टंट चंद्रपूर यांच्या नियंत्रणाखाली मंदिर खोदणे व साफसफाई करणे ही कामे सुरू आहेत. दोन महिन्यांत घृणेश्वर मंदिराचे काम पूर्ण झाले असून राजस्थानच्या कारागिरांकडून हे काम करण्यात आले. मुख्य दरवाजा खोलणे व साफसफाई करण्याचे काम भोपाळ येथील कारागीर करीत आहेत. मुख्य गाभाऱ्यातील लोखंडी गेटच्या वरचे चार पिल्लर क्रॅक झाले आहेत. त्यांना बदलविण्याकरिता मंदिर पूर्णपणे उकलण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Markandeshwar Devasthan's repair work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.