मार्कंड्यात उसळला भाविकांचा जनसागर
By Admin | Updated: August 18, 2015 01:25 IST2015-08-18T01:25:50+5:302015-08-18T01:25:50+5:30
शनिवारपासून श्रावणमासाला प्रारंभ झाला आहे. १७ आॅगस्ट रोजी पहिल्या सोमवारला मार्र्कंडादेव येथील मंदिरात

मार्कंड्यात उसळला भाविकांचा जनसागर
चामोर्शी : शनिवारपासून श्रावणमासाला प्रारंभ झाला आहे. १७ आॅगस्ट रोजी पहिल्या सोमवारला मार्र्कंडादेव येथील मंदिरात सकाळच्या सुमारास महापूजा व अभिषेक करण्यात आले. तसेच गावातून मार्र्कंडेश्वराची पालखी काढण्यात आली.
पहिल्या सोमवारी सकाळी ६ ते ८.३० वाजताच्या सुमारास मार्र्कंडेश्वर मंदिरात चामोर्शीचे तहसीलदार उमाकांत वैद्य, नंदा वैद्य, मनोज हेजीब, उज्वला हेजीब, पंकज पांडे, शुभांगी पांडे, रामुजी गायकवाड महाराज यांनी मार्र्कंडेश्वराची मुख्य पूजा केली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. यावेळी गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यासह दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी मार्र्कंडेश्वराची पूजा केली. सोमवारी दिवसभर मार्र्कंडेश्वर मंदिरात पूजाअर्चा करण्यासाठी गर्दी उसळली होती. (शहर प्रतिनिधी)
महिनाभर विशेष धार्मिक विधी
४श्रावणमास काळात महिनाभर मार्र्कंडेश्वराच्या मुख्य मंदिरात दररोज महामृत्यंूजय, मार्र्कंडेश्वरास सहस्त्र बिर्ल्वाचन महापूजा व अभिषेक हा धार्मिक विधी करण्याचा ठराव विश्वस्त मंडळाच्या सभेत घेण्यात आला. मार्र्कंडेश्वर देवस्थान मंडळाच्या वतीने भाविकांना सूचना करण्यात आल्या आहे. मार्र्कंडेश्वर मंदिरात महिनाभर विशेष धार्मिक विधी नियमितपणे चालणार आहे.