मॅराथॉन स्पर्धेचे खासदारांचे हस्ते उद्घाटन
By Admin | Updated: April 7, 2016 01:22 IST2016-04-07T01:22:46+5:302016-04-07T01:22:46+5:30
भारतीय जनता पक्षाच्या ३६ व्या स्थापना दिवसानिमित्त गडचिरोली शहर भाजपच्या वतीने इंदिरा गांधी चौक ते जिल्हा सत्र न्यायालय कोटगल रस्त्यापर्यंत

मॅराथॉन स्पर्धेचे खासदारांचे हस्ते उद्घाटन
भाजप स्थापना दिवस जिल्हाभर साजरा : गडचिरोलीत शेकडो युवक-युवती धावले
गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या ३६ व्या स्थापना दिवसानिमित्त गडचिरोली शहर भाजपच्या वतीने इंदिरा गांधी चौक ते जिल्हा सत्र न्यायालय कोटगल रस्त्यापर्यंत मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शेकडो युवक, युवतींनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाले. यावेळी प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, डॉ. भारत खटी, अविनाश महाजन, अनिल पोहोणकर, विलास भांडेकर, सुधाकर येनगंधलवार, अमित कुनघाडकर, विनोद देवोजवार, हरिष राठी, श्रीकृष्ण कावनपुरे, डेडूजी राऊत आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
प्रत्येक गावात भाजपची शाखा स्थापन करा - प्रकाश पोरेड्डीवार
आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात तीन आमदार व एक खासदार भारतीय जनता पक्षाचे आहे. त्यामुळे भाजपचा झेंडा प्रत्येक गावात झळकला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन भाजपची शाखा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावे, यातून पक्षाची ताकद वाढेल. सामान्य माणसं व कार्यकर्ते पक्षाशी जुळतील, असे प्रतिपादन गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांनी केले. राजीव भवन आरमोरी येथे भाजप स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकाश पोरेड्डीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी सह उद्घाटक म्हणून सदानंद कुथे, ज्येष्ठ नेते रामभाऊ पडोळे, तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार, श्रीहरी कोपुलवार, प्रदीप हजारे, देवाजी पिल्लारे, सुनिल नंदनवार, वेणुताई ढवगाये, मिनाक्षी गेडाम, डॉ. संगीता रेवतकर, ईश्वर पासेवार, रामभाऊ कुर्झेकर, मोहझरीचे सरपंच शालिक मोहुर्ले, डोंगरगावच्या सरपंच रचना नारगेलवार, गोपाल भांडेकर, धुरंदर सातपुते, खेमराज राऊत, दीपक निंबेकर, मनोज मने, लक्ष्मण कानतोडे, शेषराव किरणापुणे आदी उपस्थित होते. यावेळी प्रकाश पोरेड्डीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण व वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार, संचालन पंकज खरवडे, आभार नंदू नाकतोडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)