शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

दंतेवाडात माओवादाचे कंबरडे मोडले ! ६३ जहाल माओवाद्यांनी ठेवले शस्त्र; १८ महिलांचा समावेश

By संजय तिपाले | Updated: January 9, 2026 16:19 IST

Gadchiroli : छत्तीसगडमध्ये माओवादविरोधी अभियानात ९ जानेवारी रोजी सर्वांत मोठी घडामोड घडली. दंतेवाडा जिल्ह्यात एक कोटी १० लाखांचे बक्षीस असलेल्या तब्बल ६३ जहाल माओवाद्यांनी शस्त्र ठेवले.

​लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगडमध्ये माओवादविरोधी अभियानात ९ जानेवारी रोजी सर्वांत मोठी घडामोड घडली. दंतेवाडा जिल्ह्यात एक कोटी १० लाखांचे बक्षीस असलेल्या तब्बल ६३ जहाल माओवाद्यांनी शस्त्र ठेवले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने माओवाद्यांनी शस्त्रे टाकल्यामुळे हिंसक चळवळीचे कंबरडे मोडल्याची चर्चा आहे.

स्थानिक गोंडी भाषेत 'लोन वर्राटू' म्हणजे 'घरी परत या'. दंतेवाडा पोलिसांनी ही भावनिक आणि प्रभावी मोहीम सुरू केली आहे. गावोगावी नक्षलवाद्यांच्या नावे फलक लावून त्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, आतापर्यंत शेकडो नक्षल्यांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत.

याप्रसंगी सीआरपीएफच्या दंतेवाडा उपविभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक (अभियान) राकेश चौधरी, दंतेवाडा येथील पोलिस अधीक्षक गौरव राय, सीआरपीएफच्या १११ व्या, १९५ व्या आणि २३० व्या बटालियनचे कमांडंट, अप्पर पोलिस अधीक्षक रामकुमार बर्मन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

जहाल दलम सदस्यांचा समावेश

आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी संघटनेतील अंतर्गत कलहाचा पाढाच वाचला.  वरिष्ठ नेते आमचे शोषण करतात, भेदभाव करतात आणि आम्हाला विकासापासून रोखतात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शासनाच्या पुनर्वसन धोरणामुळे आपल्याला सन्मानाने जगता येईल, या आशेने या सर्वांनी हा निर्णय घेतला. यामध्ये अनेक जहाल दलम सदस्य आणि जनमिलिशिया कमांडरचा समावेश.

"'लोन वर्राटू' या मोहिमेचे हे सर्वांत मोठे यश आहे. आत्मसमर्पण केलेल्या सर्वांना तात्काळ सानुग्रह अनुदान दिले असून, त्यांचे पूर्ण पुनर्वसन केले जाईल. त्यांना घर, शेती आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील."

- गौरव राय, पोलिस अधीक्षक, दंतेवाडा, छत्तीसगड

English
हिंदी सारांश
Web Title : Maoist Insurgency Weakened in Dantewada: 63 Maoists Surrender, Including 18 Women

Web Summary : In a major blow to Maoism, 63 hardcore Maoists, including 18 women, surrendered in Dantewada, Chhattisgarh. This success of the 'Lon Varratu' campaign, urging insurgents to return home, promises rehabilitation with housing, land, and employment opportunities. Internal conflict and exploitation within the organization motivated the surrender.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगडGadchiroliगडचिरोली