शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

Corona Vaccination: अनेक अफवांमुळे दुर्गम भागात लसीकरण ठरतेय जिकिरीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 06:16 IST

गडचिरोलीत आतापर्यंत अवघी १६ टक्के उद्दिष्टपूर्ती. काेराेनासारख्या महामारी यापूर्वीही आल्या. त्यावेळी लस नव्हती. जंगलातील वनस्पतींचा काढा पिऊन आदिवासींनी महामारीवर मात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. दवाखान्यात भरती व्हावे लागते. त्यामुळे तेवढ्या दिवसाची मजुरी बुडते. याशिवाय कोरोनाची चाचणी करून किडनी काढली जाते व मारून टाकले जाते, असे एक ना अनेक गैरसमज पसरल्यामुळे गडचिरोलीच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग अजूनही मंदच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १६ टक्के लसीकरण होऊ शकले. नागरिकांमधील गैरसमज दूर करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

काेराेनासारख्या महामारी यापूर्वीही आल्या. त्यावेळी लस नव्हती. जंगलातील वनस्पतींचा काढा पिऊन आदिवासींनी महामारीवर मात केली. आजही हा काढा पित असल्याने आम्हाला काेराेना हाेऊ शकत नाही. त्यामुळे लस घेण्याची आवश्यकता नाही, असे सांगत वयाेवृद्ध नागरिक लस घेण्यास नकार देत आहेत. त्यांचे अनुकरण इतर लोक करत आहेत.

कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड या तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील गावांमध्ये गैरसमजाचे प्रमाण जास्त आहेत. १२ जूनपर्यंत काेरची तालुक्यातील केवळ ३ हजार ९८९, भामरागड तालुक्यात ४ हजार ३६८ नागरिकांनी लस घेतली आहे. तालुक्यांचा विस्तार व लाेकसंख्या लक्षात घेता हे प्रमाण अतिशय कमी आहे.

कोविडच्या साथीवर विजय मिळवण्याचा सर्वांत प्रभावी उपाय लस आहे. हा विज्ञानाचा चमत्कार की नवा रोग आल्यावर वर्षभरात त्यावर लस उपलब्ध झाली आहे. नवा उपाय स्वीकारायला समाज सहसा बराच काळ घेतो. पण या वेळेस आपण वेळ दवडता कामा नये. जो लस घेईल तो स्वतःचे रक्षण करेल व इतरांचेही.- डाॅ अभय बंग, ज्येष्ठ समाजसेवक

आराेग्य कर्मचारी येताच दरवाजे हाेतात बंदnप्रशासनामार्फत दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. मात्र लसविषयीची भीती नागरिकांच्या मनात घर करून बसली असल्याने नागरिक पुढे येत नाही. nगावात आराेग्य कर्मचारी आल्याचे माहीत हाेताच नागरिक दरवाजे बंद करून घरात लपून बसतात किंवा शेतावर निघून जातात.

हे आहेत विविध गैरसमजnवनस्पतींचा काढा पीत असल्याने लसची गरज नाही.nयापूर्वी अनेक महामाऱ्या बघितल्या आहेत.nलसीच्या नावाने काेराेना चाचणी केली जाते.nकाेराेनाच्या नावाने गडचिराेलीच्या दवाखान्यात भरती करून किडनी काढली जाते.nसरकार लाेकसंख्या कमी करण्यासाठी लस देऊन मारणार आहे.nमेल्यानंतर मृतदेह परस्पर जाळून टाकल्या जाते.nशरीर कमजाेर हाेते.nलसने अनेक दिवस ताप येते. नंतर मृत्यू हाेतेे.nपुढे मुलबाळ हाेत नाही.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस