बालगुन्हेगारांसाठी ‘जुवेनाईल’ची निर्मिती

By Admin | Updated: February 4, 2016 01:27 IST2016-02-04T01:27:14+5:302016-02-04T01:27:14+5:30

आजच्या धकाधकीच्या जगात बालकांचे संरक्षण महत्त्वपूर्ण आहे. पालकवर्ग मुलांच्या भविष्याचा शोध घेत असतो. परंतु अवधानाने त्याच्या हातून गुन्हा घडतो,

Manufacture of 'Juvenile' for the Balchuvarsinh | बालगुन्हेगारांसाठी ‘जुवेनाईल’ची निर्मिती

बालगुन्हेगारांसाठी ‘जुवेनाईल’ची निर्मिती

कोरडे यांची माहिती : नवीन सुधारित कायद्यावर जनजागृती
गडचिरोली : आजच्या धकाधकीच्या जगात बालकांचे संरक्षण महत्त्वपूर्ण आहे. पालकवर्ग मुलांच्या भविष्याचा शोध घेत असतो. परंतु अवधानाने त्याच्या हातून गुन्हा घडतो, या मागे घर, समाजातील वातावरण व संस्कारही कारणीभूत असतात. अशा १८ वर्षाखालील मुले व मुलींना संरक्षणाच्या हेतूने तो मुलगा खरोखरच गुन्हेगार आहे का, असा विधी संघर्षित बालक म्हणूून त्याच्या विरूद्धच्या कारवाईसाठी नवीन सुधारित संरक्षणात्मक जुवेनाईल कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त सहायक दिवाणी न्यायाधीश एल. डी. कोरडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा महिला, बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना कर्तव्य, भूमिका व जबाबदारी यांची माहिती व्हावी, यासाठी बाल न्याय अधिनियम जनजागृती कार्यक्रम मंगळवारी जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. बी.डी. हुकरे, अतिरिक्त सहायक दिवाणी न्यायाधीश अटकारे, बाल न्याय मंडळाचे सदस्य अ‍ॅड. राहुल नरूले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे, शिक्षणाधिकारी माणिक साखरे, पोलीस निरीक्षक नलावडे उपस्थित होते. प्रास्ताविक अविनाश शेटीया यांनी केले. कार्यक्रमाला बाल पोलीस पथक, बाल संरक्षण युनिट, बाल न्याय मंडळ, पोलीस पाटील, शिक्षण, आदिवासी, कामगार विभागाचे प्रतिनिधी हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी)

कुणीही जन्मापासून गुन्हेगार नसतो- कळसकर
अहेरी : मुलं हे जन्मापासून गुन्हेगार नसतात, त्यांना प्रेमरूपी योग्य संस्काराची गरज असते, ते मिळाल्यास कधीही ते गुन्हेगारीकडे वळू शकत नाही, असे प्रतिपादन अहेरीचे न्यायाधीश दि. जे. कळसकर यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली अंतर्गत तालुका विधी सेवा समिती, अहेरीतर्फे दिवाणी व फौजदारी न्यायालय अहेरी येथील सभागृहात बाल न्यायालय विषयी मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला अ‍ॅड. पी. एस. डंबोळे, अ‍ॅड. एस. व्ही. जैनवार, अ‍ॅड. व्ही. एस. गलबले उपस्थित होते. याप्रसंगी न्यायाधीश कळसकर म्हणाले की, सर्व न्यायालयीन बाबी गोपनीयतेने करण्याचे कार्य बाल कल्याण समिती , बाल न्याय मंडळतर्फे होत असतात ह्यासाठी सहकार्य करावे व सर्वांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कार्य करावे. प्रास्ताविक एस.व्ही. जैनवार, संचालन व्ही.एस. गलबले व आभार पी.एस. डंबोळे यांनी केले. कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व स्वयंसेविका उपस्थित होत्या.

Web Title: Manufacture of 'Juvenile' for the Balchuvarsinh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.