‘मांजरा’ने तळ गाठला

By Admin | Updated: July 3, 2014 23:33 IST2014-07-03T23:33:08+5:302014-07-03T23:33:08+5:30

कळंब : शहरासह लगतच्या डिकसळ गावास पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा उद्भव असणाऱ्या मांजरा धरणातील जलसाठ्याने तळ गाठला आहे.

'Manjra' has reached the bottom | ‘मांजरा’ने तळ गाठला

‘मांजरा’ने तळ गाठला

आत्मसमर्पण योजना : आर. आर. पाटील यांचे प्रतिपादन
गडचिरोली : नक्षलग्रस्त, आदिवासी दुर्गम मागास गडचिरोली जिल्ह्यात नक्षल कारवायांना रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. आत्मसमर्पण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. विकास कामे मार्गी लागण्यासाठी तसेच चुकीच्या दिशेने गेलेल्या नक्षल्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवजीवन आत्मसमर्पण योजनेत आमुलाग्र बदल लवकरच करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी केले.
जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने आज गुरूवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित आत्मसमर्पीत नक्षल्यांच्या स्वागत सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाधिकारी रणजित कुमार, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, पोलीस अधीक्षक सुवेज हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना, राजकुमार शिंदे, प्रकल्प अधिकारी तथा गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री आर. आर. पाटील म्हणाले, सध्या सुरू असलेले आत्मसमर्पण योजना अपूर्ण आहे. आत्मसमर्पीत नक्षल्यांना सुरक्षेची हमी आवश्यक आहे. आतापर्यंत नक्षल कारवायांमुळे अनेक आदिवासींचा निरपराथ बळी गेला आहे. शस्त्राचे उत्तर पोलीस जवान शस्त्रानेच देतील. शांतीचा मार्ग पत्करणाऱ्या आत्मसमर्पीत नक्षल्यांना जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन स्वावलंबी होण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजाविणार आहे. याचाच एक भाग म्हणून नाविन्यपूर्ण आत्मसमर्पण योजना लवकरच सुरू करणार असल्यसाचे पाटील यावेळी म्हणाले. आदिवासी दुर्गम भागात गुणवत्ता असलेली मुले कमी नाही. प्रशासनाच्यावतीने गतवर्षी जिल्ह्यातील दुर्गम भागातील ४६ मुलांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. सदर विद्यार्थी आता उत्कृष्ट इंग्रजी बोलत असून शहराच्या मुलांसोबत ते गुणवत्तेत स्पर्धा करीत आहेत, असेही पाटील यावेळी म्हणाले. याप्रसंगी पाकलमंत्री पाटील यांच्या हस्ते सन २०१४ मध्ये नवजीवन योजनेंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या १५ नक्षल्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच या आत्मसमर्पीत नक्षल्यांना राशन कार्ड, शिलाई मशीन, धनादेश वितरण करण्यात आले.
याप्रसंगी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी सर्वसामान्य आदिवासी नागरिकांचे डोके खराब करणारे मेंदू हे मुंबई, दिल्लीसारख्या शहरात आहे. बळजबरीने आदिवासी नागरिकांना नक्षलचळवळीत ओढल्या जात आहे. जिल्ह्यात नक्षलवाद कमी करण्यात गृहमंत्री पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे, असे डॉ. उसेंडी म्हणाले. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार करेल. आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांसाठी दीडशे भुखंड तयार असून त्याचे वाटप लवकरच केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आत्मसमर्पीत नक्षलवादी बिरजू उर्फ क्रिष्णा मासा दोरपेठे यांनी आपण वयाच्या १५ वर्षांपासून नक्षलचळवळीत काम करीत असल्याचे सांगितले. मात्र नक्षल चळवळीत वेळेवर पाणी, भोजन मिळत नाही. पहाडी व जंगल परिसरात बाराही महिने भटकत राहावे लागते. चळवळीतले जीवन अतिशय कष्टाचे व दु:खाचे आहे. त्यामुळेच आपण आत्मसमर्पण केल्याचे बिरजू दोेरपेठे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. परदू उर्फ सगणु उसेंडी व रेणुका उर्फ जानकी तिम्मा यांनी योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे चुकीच्या मार्गाने गेले होतो. मात्र आता नवजीवन योजनेंतर्गत आत्मसमर्पण केल्यानंतर आमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन झाले असून आम्हाला शासन व प्रशासनाचे चांगले सहकार्य लाभत असल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक सुवेज हक, संचालन धर्मेंद्र जोशी यांनी केले तर आभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 'Manjra' has reached the bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.