आक्षेपार्ह विधान भोवले; माना समाज आक्रमक, माजी मंत्री शिवाजीराव मोघेंविरुद्ध मोर्चा

By संजय तिपाले | Published: October 13, 2023 04:35 PM2023-10-13T16:35:19+5:302023-10-13T16:36:56+5:30

वादग्रस्त विधान केल्याने व्यक्त केला रोष

Mana community march against former minister Shivajirao Moghe at gadchiroli | आक्षेपार्ह विधान भोवले; माना समाज आक्रमक, माजी मंत्री शिवाजीराव मोघेंविरुद्ध मोर्चा

आक्षेपार्ह विधान भोवले; माना समाज आक्रमक, माजी मंत्री शिवाजीराव मोघेंविरुद्ध मोर्चा

गडचिरोली : माना समाजाबद्दल माजी मंत्री व काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांनी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ कुरखेडा येथे उपविभागीय कार्यालयावर १३ ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोघे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करुन पोलिस ठाण्यात तक्रारही दिली.

 नागपूर येथे पार पडलेल्या आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपली सत्ता आल्यास वरिष्ठ आयोग नेमून अनुसूचित जमाती प्रवर्गात चुकीने समावेश करण्यात आलेल्या माना समाजाला काढून टाकू, असे वादग्रस्त विधान केले होते. यावेळी मंचावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी उपस्थित होते. मोघेंच्या या वादग्रस्त विधानावरून माना समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी निषेध नोंदविण्यात येत आहे. शुक्रवारी कुरखेडा शहरात माना समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला.  त्यांनी संपूर्ण माना समाजाचा अपमान केला आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण केली आहे,  असा आरोप समाजबांधवांनी यावेळी केला.  

माना समाज १८ व्या क्रमांकावर

माना ही स्वतंत्र आदिवासी जमात असून जिल्ह्यात मोठी संख्या आहे.  समाजाच्या स्वतंत्र धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आहेत. केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीत माना समाज १८ व्या क्रमांकावर आहे. सन १९५५ मध्ये काका कालेलकर आयोगाने माना समाजाला अनुसूचित जमातीचे सर्व अधिकार व हक्क बहाल केले होते. तेव्हापासूनच माना समाज अनुसूचित प्रवर्गात मोडतो, असा दावा माना समाजबांधवांनी केला आहे.

Web Title: Mana community march against former minister Shivajirao Moghe at gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.