बिनागुंडा परिसरात हिवतापाच्या चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:12+5:302021-06-06T04:27:12+5:30
लाहेरी : भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आराेग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या बिनगुंडा परिसरातील नागरिकांमध्ये हिवतापाबाबत जागृती करण्यात आली. जिल्हा हिवताप ...

बिनागुंडा परिसरात हिवतापाच्या चाचण्या
लाहेरी : भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आराेग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या बिनगुंडा परिसरातील नागरिकांमध्ये हिवतापाबाबत जागृती करण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकारी व त्यांच्या चमूने दाेन दिवस या भागात मुक्काम करून प्रचार केला.
बिनागुंडा परिसरातील फाेदेवाडा व कुव्वाकाेडी आराेग्य उपकेंद्रात दरवर्षीच हिवतापाचे अनेक रुग्ण आढळून येतात. ही गावे लाहेरीपासून ३० किमी अंतरावर आहेत. पावसाळ्यात चार महिने या गावांचा संपर्क हाेत नाही. मे महिन्यात बिनागुंडा, कुव्वाकाेडी या उपकेंद्राअंतर्गत ९१ हिवतापाचे रुग्ण आढळून आले. हिवतापासाठी संवेदनशील असलेल्या बिनागुंडा, फाेदेवाडा, कुव्वाकाेडी, गुंडेनूर व बंगाळी या गावांना जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. कुणाल माेडक, आराेग्य पर्यवेक्षक संभा माैदेकर, प्रयाेगशाळा वैज्ञानिक अधिकारी समर्थ, आराेग्य सहायक कालिदास राऊत यांच्या पथकाने भेट दिली.
आशा कार्यकर्तीच्या मदतीने नागरिकांना गाेटूलमध्ये बाेलावून हिवताप प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्याविषयी माहिती देण्यात आली. रक्तनमुने व आरटीकेेद्वारे हिवतापाची तपासणी करण्यात आली असता, २२ दूषित रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आला. पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटत असल्याने गावातील कर्मचारी व आशा कर्मचारी यांच्याकडे औषधसाठा ठेवण्याच्या सूचना लाहेरीचे वैद्यकीय अधिकारी डाॅॅ. महेंद्र जगदाडे यांना देण्यात आल्या.