लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/गडचिरोली : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा व तालुक्याचा आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासोबतच अहेरी उपविभागात मलेरियाचे रुग्ण आढळून आल्याने आता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून अहेरी उपविभागातील तीन व धानोरा मिळून एकूण चार तालुक्यात मलेरियाबाबतचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मडावी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मलेरिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. अहेरी उपविभागातील अनेक दुर्गम व अतिदुर्गम गावांमध्ये पक्के रस्ते नाही. बºयाच ठिकाणच्या नाल्यांवर पुलांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी ठेंगणे पूल आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना दवाखान्यापर्यंत औषधोपचारासाठी पोहोचणे कठीण होते. परिणामी दुर्गम भागातील रुग्ण मांत्रिकाचा आधार घेतात. परिणामी यामुळे रुग्ण दगावतो. अहेरी उपविभागातील भामरागड, एटापल्ली, अहेरी तसेच धानोरा तालुक्यात मलेरियाचा उद्रेक दरवर्षी पावसाळ्यात होत असतो. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने या चारही तालुक्यात ‘मिशन मलेरिया अंतर्गत’ सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. अहेरी तालुक्यात तीन चमू गावागावात जाऊन मलेरियाबाबत सर्वेक्षण करीत आहेत. तीन चमू मिळून एकूण १८ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेडे यांच्या नेतृत्वात चमू गावागावांना भेटी देऊन मलेरिया रोगाबाबत जाणीवजागृती करीत आहेत. घ्यावयाची काळजी, कराव्याच्या उपययोजना आदींची माहिती नागरिकांना देत आहेत.अहेरी तालुक्यातील महागाव बुज, पेरमिली, कमलापूर, जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावांना भेटी देण्यात आले असून तीन दिवसांत २० गावांमधील १ हजार ३७३ कुटुंबातील ६ हजार १२० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.अशाच प्रकारची आरोग्य तपासणी भामरागड, धानोरा व एटापल्ली तालुक्यात सुरू आहे. गावातील नागरिकांचा या सर्वेक्षण मोहिमेला प्रतिसाद व सहकार्य मिळत आहे. स्वच्छता पाळण्याबाबतचे आवाहन केले जात आहे.सकाळीच पथक होते गावात रवानासध्या खरीप हंगामातील धान रोवणीचे काम तालुक्यात सुरू आहे. गावातील बहुतांश नागरिक शेतीच्या कामासाठी शेतात जातात. गावातील नागरिकांची भेट होऊन तपासणी व्हावी, यासाठी मलेरिया मशिन अंतर्गत गठित केलेले पथक सकाळीच गावागावात रवाना होत आहे. नागरिकांशी चर्चा करून त्यांची आरोग्य तपासणी करीत आहेत.आरोग्य विभागाच्या वतीने मिशन मलेरिया सर्वेक्षण सुरू आहे. खबरदारी म्हणून मलेरियाबाबत ही आरोग्य तपासणी केली जात आहे. नागरिकांनी ताप वा इतर लक्षणे आढळून आल्यास चमूला सांगावे.- डॉ.किरण वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी, अहेरी
चार तालुक्यात मलेरिया सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मडावी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मलेरिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. अहेरी उपविभागातील अनेक दुर्गम व अतिदुर्गम गावांमध्ये पक्के रस्ते नाही. बºयाच ठिकाणच्या नाल्यांवर पुलांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी ठेंगणे पूल आहेत.
चार तालुक्यात मलेरिया सर्वेक्षण
ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा अलर्ट : धानोरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड तालुक्यात मोहिम प्रारंभ