वनहक्क पट्टेधारकांना सातबारा उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:40 IST2021-09-26T04:40:13+5:302021-09-26T04:40:13+5:30
कोंढाळासह अनेक गावातील शेतकऱ्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे मिळून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्यापपर्यंत सातबारा उपलब्ध झाला नाही. सातबाराअभावी शेतकऱ्यांना ...

वनहक्क पट्टेधारकांना सातबारा उपलब्ध करून द्या
कोंढाळासह अनेक गावातील शेतकऱ्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे मिळून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्यापपर्यंत सातबारा उपलब्ध झाला नाही. सातबाराअभावी शेतकऱ्यांना आधारभूत धान विक्रीच्या लाभासह इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी यांनी २८ वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना घेऊन आमदार कृष्णा गजबे यांची भेट घेतली. या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली. या समस्येची दखल घेत आमदार कृष्णा गजबे यांनी देसाईगंजचे तहसीलहार संतोष महाले यांची भेट घेऊन वनहक्क पट्टेधारकांना सातबारा उपलब्ध करून द्या अशा सूचना केल्या. यावेळी कोंढाळासह अनेक गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.