शुध्द आचरणातून जीवनाचे सार्थक करा
By Admin | Updated: October 6, 2015 01:46 IST2015-10-06T01:46:22+5:302015-10-06T01:46:22+5:30
काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ हे माणसाच्या मनातील दुर्गुण व विकार आहेत. हे दुर्गुण मानसाला विनाशाकडे नेतात.

शुध्द आचरणातून जीवनाचे सार्थक करा
आरमोरी : काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ हे माणसाच्या मनातील दुर्गुण व विकार आहेत. हे दुर्गुण मानसाला विनाशाकडे नेतात. मनुष्य जीवन ही एक मिळालेली संधी आहे. हा जन्म भक्ती करण्याचा आणि मुक्ती मिळविण्याचा आहे. चांगले बोलणे, चांगले वागणे, दुसऱ्याचे हित जपणे ही खरी ईश्वराची भक्ती आहे. त्यामुळे मनातील विकार काढून टाका व चांगले विचार मनात साठवून मनुष्य जीवनाचे सार्थक करा, असा उपदेश जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी अनुयायांना केला. आरमोरी येथे सोमवारी आयोजित प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते.
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्तसेवा मंडळ आरमोरी व नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ जिल्हा सेवा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित या कार्यक्रम सोहळ्यात दर्शन सोहळा, सामाजिक उपक्रम व रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, आमदार क्रिष्णा गजबे, डॉ. देवराव होळी, प्रकाश पोरेड्डीवार, हरीश मने, भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, राकाँ जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, भाग्यवानजी खोब्रागडे, राजू अंबानी, लक्ष्मी मने, नंदू नरोटे, डॉ. गवळी आदी उपस्थित होते. यावेळी नरेंद्राचार्य महाराज यांनी विज्ञानाने क्रांती केली असली तरी मनुष्य मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला अध्यात्माची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन केले. (वार्ताहर)
नरेंद्राचार्यांच्या हस्ते ३० जणांना साहित्य वितरण
४नरेंद्राचार्य महाराजांच्या हस्ते आरमोरी येथील कार्यक्रमात १० महिलांना शिलाई मशीन, १० शेतकऱ्यांना स्पे्र पंप व १० लोकांना ताडपत्रीचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा बर्डी येथे रक्तदान शिबिरही घेण्यात आले.