शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाबाबत ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करा

By admin | Updated: September 2, 2016 01:18 IST

अवयव दानाबाबत नागरिकांना फारशी माहिती उपलब्ध नाही. रक्तदानाविषयी आरोग्य विभाग व प्रशासनाने

खासदारांचे प्रतिपादन : संकल्प करणाऱ्यांचा सत्कारगडचिरोली : अवयव दानाबाबत नागरिकांना फारशी माहिती उपलब्ध नाही. रक्तदानाविषयी आरोग्य विभाग व प्रशासनाने केलेल्या जनजागृतीनंतर नागरिक स्वत:हून रक्तदान करण्यास तयार होता. त्याचप्रमाणे अवयवदानासाठीही नागरिक समोर येण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे देहदान, नेत्रदान व अवयवदानाकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया बाह्यरूग्ण विभागात सुरू करण्यात आली आहे. या अगोदर अवयवदानाचे अर्ज भरलेल्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्याचा कार्यक्रम गुरूवारी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, डॉ. किरण मडावी, डॉ. शेंद्रे, सुधाकर येनगंधलवार, रेखा डोळस, स्वप्नील वरघंटे, मनोहर हेपट, डॉ. शिवनाथ कुंभारे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. कुंभारे यांनी अवयवदान करण्याची प्रक्रिया व अवयव प्रत्यारोपणाबाबतची विस्तृत माहिती विशद केली. आपले अवयवदान करून तुम्ही या जगात जीवंत राहण्याची किमय्या साधू शकता, असे मार्गदर्शन केले. अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी गडचिरोली जिल्हा राज्यात वनपट्टे वितरण, आधार कार्ड तसेच विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात अग्रस्थानी आहे. अवयवदान करण्यातही आपण आघाडी घेऊ, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी अवयवदानाविषयी चित्रकला, रांगोळी, निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा स्मृतीचिन्ह व पारितोषीक देऊन सन्मान करण्यात आला. संचालन डॉ. प्रशांत किलनाके, आभार डॉ. शैलजा मैदमवार यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)अवयव दानाचा संकल्प करणाऱ्यांचा सत्कारअवयवदान करण्याचा संकल्प केलेल्या खासदार अशोक नेते, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, मंजुनाबिन जोशी, मुकूंद जोशी, संजय नेरलावार, सुमित सोनटक्के, देवानंद कामडी, प्रांजली आर्इंचवार, शंकुतला पाठक, सुचित कामडी, दादाराव अढाऊ, बबिता अढाऊ, विवेक मुरकुटे, स्मिता लडके, सुरेश लडके, डॉ. प्रमोद खंडाते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.