हागणदारी व व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करा
By Admin | Updated: December 22, 2015 01:37 IST2015-12-22T01:37:19+5:302015-12-22T01:37:19+5:30
आपण येवली गावाला विकासासाठी दत्तक घेतले आहे. या गावाला हागणदारी व व्यसनमुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी

हागणदारी व व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करा
गडचिरोली : आपण येवली गावाला विकासासाठी दत्तक घेतले आहे. या गावाला हागणदारी व व्यसनमुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.
येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे उद्घाटन येवली येथे रविवारी करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वाघमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे, येवली आदर्श ग्राम समितीचे अध्यक्ष विलास भांडेकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. धनंजय माने, येवलीच्या सरपंच गीता सोमनकर, उपसरपंच सुरेखा भांडेकर, लता मेश्राम, चोखाजी भांडेकर, अमोल वाघमारे, विलास मेश्राम, मोरेश्वर भांडेकर, प्रा. प्रशांत अष्टपूत्रे, लक्ष्मीछाया मेश्राम, मुख्याध्यापिका कल्पना डोमळे, साईनाथ वासेकर, सुरभी धारणे आदी उपस्थित होते.
या रासेयो शिबिरात शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे ४२ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत अष्टपूत्रे, संचालन प्रणाली कंबगोणीवार यांनी केले. या शिबिराचा समारोप २५ डिसेंबर रोजी गुरूवारला आमदार डॉ. देवराव होळी, प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट, प्राचार्य डॉ. जयराम खोब्रागडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाला येवलीचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)