मजिप्रा कर्मचारी बेमुदत संपावर

By Admin | Updated: March 7, 2017 00:51 IST2017-03-07T00:51:01+5:302017-03-07T00:51:01+5:30

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.

Majipra staff unrestrained strike | मजिप्रा कर्मचारी बेमुदत संपावर

मजिप्रा कर्मचारी बेमुदत संपावर

आंदोलन : पाणीपुरवठ्यावर परिणाम
गडचिरोली : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे गडचिरोली येथील जिल्हा कार्यालय बंद ठेवण्यात आले. त्याचबरोबर या बंदचा परिणाम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मार्फतीने चालविल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनांवरही झाला.
गडचिरोली येथील आंदोलनात उपविभागीय अभियंता जी. एम. बारसागडे, शाखा अभियंता व्ही. एस. कोल्हे, ए. जे. लोणारे, एस. ए. जोगी, वरिष्ठ लिपीक डी. एन. सयाम, कनिष्ठ लिपीक एस. आर. बुराडे, कारकून ए. एन. सातपैसे, वाहनचालक एन. जे. लोनबले, शिपाई के. बी. मडावी, चौकीदार एस. आर. मडावी यांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्ती वेतनाचे दायीत्त्व शासनाने स्वीकारावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने १ मार्चपासून काळ्याफिती लावून काम सुरू केले. त्यानंतर सोमवारपासून सदर कर्मचारी बेमुदत संपावर गेले. प्रश्न मार्गी लागेपर्यंत संप करण्याचा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Majipra staff unrestrained strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.