हिंदू असल्याचा स्वाभिमान कायम ठेवा
By Admin | Updated: December 29, 2014 01:22 IST2014-12-29T01:22:12+5:302014-12-29T01:22:12+5:30
५ हजार ११६ वर्षांपूर्वी महाभारतात अधर्माविरूद्ध धर्माचे युद्ध झाले. या युद्धात धर्म व सत्याचा विजय झाला. नऊ लाख वर्षापूर्वीपासून देशात हिंदूंचे वास्तव्य आहे.

हिंदू असल्याचा स्वाभिमान कायम ठेवा
गडचिरोली : ५ हजार ११६ वर्षांपूर्वी महाभारतात अधर्माविरूद्ध धर्माचे युद्ध झाले. या युद्धात धर्म व सत्याचा विजय झाला. नऊ लाख वर्षापूर्वीपासून देशात हिंदूंचे वास्तव्य आहे. अशा प्राचीन व संत महात्म्यांची परंपरा व संस्कार लाभलेल्या हिंदू धर्माविषयीचा स्वाभिमान कायम ठेवा, असे कळकळीचे आवाहन अंजनगाव (सुर्जी) मठाचे पीठाधिश्वर परम् पूज्य जितेंद्रनाथ महाराज यांनी केले.
विशाल हिंदू संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार क्रिष्णा गजबे विहिंपचे प्रांतसह मंत्री डॉ. हेमंत जांबेकर, विभाग मंत्री प्रा. डॉ. सुरेश परसावर, जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, विनायक रोडे महाराज, राकडे महाराज, डॉ. शिवनाथ कुंभारे, भाग्यवान खोब्रागडे, मार्र्कंडेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, नंदाजी सातपुते, यशवंत नवघडे, संघचालक घिसुलाल काबरा, दिलीप सारडा आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरूवात जितेंद्रनाथ महाराज यांच्याहस्ते गोमातेचे पूजन करून करण्यात आली. पुढे बोलतांना जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, इंग्रजांनी जातीपातीत हिंदंूना विभाजित करून हिंदू धर्म तोडण्याचे व फोडण्याचे काम केले. हिंदू ही एकच जात आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी हिंदूंच्या इतिहासाचे स्मरण करून हिंदूंची संस्कृती व परंपरा कायम ठेवावी, हिंदूंच्या भगवतगीता व अन्य ग्रंथांचे नेहमी वाचन, चिंतन व मनन करावे, असे सांगितले. प्रास्ताविक विहिंपचे जिल्हामंत्री नारायण खटी, संचालन गिरीष तळवलकर यांनी केले तर आभार विनय मडावी यांनी मानले.
जिजाऊसारखी माता अन् शहाजींसारख्या पित्याची गरज
देशातील समस्त हिंदूंचे पे्ररणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वाभिमानी हिंदू राजे म्हणून घडविण्यात मॉ जिजाऊ व राजे शहाजी यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र असे मातापिता सध्याच्या युगात दिसून येत नाही. देशातील हिंदूंच्या अस्तित्वासाठी अशा मातापित्यांची गरज आहे.