युथ काँग्रेस लोकसभा क्षेत्र अध्यक्षपदी महेंद्र ब्राह्मणवाडे; गडचिरोलीत जल्लोष
By Admin | Updated: September 27, 2015 01:06 IST2015-09-27T01:06:17+5:302015-09-27T01:06:17+5:30
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र युवक काँग्रेस अध्यक्ष पदी महेंद्र ब्राह्मणवाडे यांची निवड करण्यात आली आहे.

युथ काँग्रेस लोकसभा क्षेत्र अध्यक्षपदी महेंद्र ब्राह्मणवाडे; गडचिरोलीत जल्लोष
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र युवक काँग्रेस अध्यक्ष पदी महेंद्र ब्राह्मणवाडे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव हिंमतसिंह यांनी नियुक्तीचे पत्र प्रदान केले आहे. महाराष्ट्र प्रभारी हरिक्रिष्ण पुजाला व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत पतंगराव कदम यांच्या शिफारसीनंतर ब्राह्मणवाडे यांची निवड करण्यात आली आहे. ब्राह्मणवाडे यांच्या निवडीची घोषणा शनिवारी होताच गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात काँग्रेस, युवक काँग्रेस एनएसयुआयच्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. ब्राह्मणवाडे यांच्या नियुक्तीसाठी काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव लता पेदापल्ली, कुणाल राऊत, रवींद्र दरेकर, पंकज गुड्डेवार, हसनअली गिलानी, सतीश विधाते यांनी पक्ष संघटनस्तरावर सहकार्य केले. इंदिरा गांधी चौकात जल्लोष साजरा करताना एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, गौरव अलाम, वृषभ धुर्वे, राकेश गणवीर, तुषार कुळमेथे, राकेश गडपल्लीवार, प्रतीक मुंजमकर, प्रफुल आचले, नचिकेत जंबेवार, तौफिक शेख, सुमित सिडाम, अमर नवघडे, शुभम जनबंधू, निकेश बाळेकरमकर, दर्शन वालदे, सुमित बारई, अभिजीत धाईत, विवेक घोंगडे, अजर कुमरे, नितीन चलाख, हेमंत मोहितकर, नितेश हेमके, सौरभ म्हशाखेत्री, सहदेव ससाने, राज सोनुले, आकाश बघेल, अमोल भडांगे, रजनीकांत मोटघरे, जीवन कुत्तरमारे, दीपक ठाकरे, नंदू खांदेशकर, मिलिंद खोब्रागडे, प्रतीक बारसिंगे आदी उपस्थित होते.