शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

महायुतीकडून धर्मरावबाबांनाच उमेदवारी, अम्ब्रीशरावांना शह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 15:58 IST

अखेर पेच सुटला : राजपरिवारातील लढतीची उत्कंठा वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पहिल्या यादीत अहेरी मतदारसंघातून अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी जाहीर केल्याने या जागेवरुन सुरु असलेल्या दावे- प्रतिदाव्यांना पूर्णविराम मिळाला आहे. माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम हे महायुतीकडून लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, अजित पवार यांनी ही जागा आपल्याच कोट्यात ठेवून धर्मरावबाबा आत्राम यांना ताकद दिली आहे. 

राजकीयदृष्ट्या अहेरी मतदारसंघ अतिशय प्रतिष्ठेचा आहे. महायुतीत या जागेचा तिढा अखेर सुटला असून धर्मरावबाबा यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचे पुतणे व माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचा दावा संपुष्टात आला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्री आत्राम समर्थकांनी जल्लोष केला, तर अम्ब्रीशराव समर्थकांत सन्नाटा पसरला आहे. एकप्रकारे महायुतीत उमेदवारी मिळवून धर्मरावबाबांनी अम्ब्रीशराव यांना शह दिल्याचे मानले जात आहे. 

बालेकिल्ला अबाधित राखण्याचे आव्हान धर्मरावबाबा आत्राम यांचा राजकीय प्रवास सरपंच ते कॅबिनेट मंत्री असा थक्क करणारा आहे. १९८० मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. सरपंच, जि. प. सदस्य, पंचायत समिती सभापती व नंतर ते विधानसभेच्या मैदानात उतरले.

ज्या-ज्यावेळी ते आमदार झाले तेव्हा तेव्हा मंत्री झाले तसेच गडचिरोली जिल्ह्यातील पहिले कॅबिनेट मंत्रीपदही त्यांनीच भूषविले त्यामुळे बालेकिल्ला अबाधित राखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.

सातवेळा मैदानात, चारवेळा विजयवर्ष               विजयी / पराभूत  १९९०                 विजयी १९९५                 पराभूत १९९९                 विजयी २००४                 विजयी २००९                 पराभूत २०१४                 पराभूत २०१९                 विजयी

भाग्यश्री आत्रामांचे काय ? महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. वडिलांच्या विरोधात बंड करून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या भाग्यश्री आत्राम यांच्या गोटात अस्वस्थता आहे. ही जागा कोणाला सुटणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार, भाग्यश्री यांची वाटचाल कशी राहणार, याबाबत संभ्रम कायम आहे. 

अम्ब्रीशराव यांचे तळ्यात मळ्यात 

  • उमेदवारी धोक्यात असल्याची कुणकुण लागल्यावर अम्ब्रीशराव आत्राम यांनी तातडीने मुंबई गाठली. नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. 
  • भाजपकडून उमेदवारीची आशा मावळल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट तसेच काँग्रेसशीही बोलणी करीत आहेत. सध्यातरी त्यांची राजकीय दिशा अस्पष्ट आहे. 
  • मात्र, २४ ऑक्टोबरला ते नामांकन दाखल करणार असल्याच्या पोस्ट समर्थकांनी समाजमाध्यमात टाकल्या आहेत.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gadchiroli-acगडचिरोलीGadchiroliगडचिरोलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस