शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; निवडणूक कर्मचाऱ्यांनी केली अनेक अडचणींवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी सदर निवडणूक चोख पोलीस बंदोबस्तात व सुरक्षा व्यवस्थेत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते. त्यासाठी त्यांच्या चमूने सहकार्य केले. नक्षलवाद्यांच्या गडामध्ये बऱ्याच प्रमाणात मतदान यशस्वी करण्यात अधिकाऱ्यांना यश आले. अहेरी मतदार संघातील सर्व केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ठळक मुद्देपोलिसांसोबत पायपीट : हेलिकॉप्टरची महत्त्वपूर्ण मदत

रमेश मारगोनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी नक्षलग्रस्त अहेरी मतदार संघात मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडणे जिल्हा प्रशासन व पोलीस विभागासाठी मोठे आव्हान होते. मात्र पोलीस अधिकारी व जवानांनी हेलिकॉप्टरची मदत घेत निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोबत ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. निवडणुकीच्या या प्रक्रियेत पोलिसांसह निवडणूक कर्मचाऱ्यांनाही जंगलातून पायपीट करावी लागली.भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी सदर निवडणूक चोख पोलीस बंदोबस्तात व सुरक्षा व्यवस्थेत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते. त्यासाठी त्यांच्या चमूने सहकार्य केले. नक्षलवाद्यांच्या गडामध्ये बऱ्याच प्रमाणात मतदान यशस्वी करण्यात अधिकाऱ्यांना यश आले. अहेरी मतदार संघातील सर्व केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही मतदान केंद्र ऐनवेळी बदलविण्यात आले. दरम्यान घातपात घडवून आणण्याचे नक्षलवाद्यांचे मनसुबे पूर्णत: अपयशी ठरले.दुर्गम भागात पोलिंग पार्ट्या पोहोचविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. जिल्हा पोलीस व प्रशासनाच्या वतीने अहेरी मतदार संघात दोन हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले होते. पण हेलिकॉप्टरची सोय मुख्यालय ते बेस कॅम्पपर्यंतच होती. मतदान केंद्रातून पोलिंग पार्ट्या बेसकॅम्पपर्यंत साहित्यासह पायी पोहोचल्या. त्यानंतर येथून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अहेरी प्राणहिता मुख्यालयात पोहोचविण्यात आल्या. ताडगाव बेस कॅम्पवरून इरकडुम्मे, चिचोडा, कुकडेली, मन्नेराजाराम, भामनपल्ली, येचली आदी अतिसंवेदनशील केंद्रांवरून पोेलिंग पार्ट्यांना सुरक्षितपणे पोहोचविण्यात आले.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली