शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Election 2019 ; मतदानासाठी काऊंटडाऊन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

येत्या १९ ऑक्टोबरला सायंकाळी जाहीर प्रचार थांबेल. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आपल्या विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयी रॅली काढून शहरी मतदारांना साद घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अद्याप प्रचारापासून दूर असलेल्या गावांमध्ये पोहोचण्यासाठी उमेदवारांच्या हातात केवळ ३ दिवस आहेत.

ठळक मुद्देमोठ्या नेत्यांच्या सभाच नाही : आता केवळ चार दिवसांचा खेळ बाकी; उमेदवारांसह कार्यकर्त्यांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग वाढत आहे. प्रचारासाठी केवळ चार दिवस हाती असल्यामुळे या दिवसात शिल्लक राहिलेला परिसर पिंजून काढण्यावर जोर दिला जात आहे. परंतू जिल्ह्यात काही नेत्यांचा अपवाद वगळता यावेळी कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या नसल्यामुळे निवडणुकीची रंगत पाहीजे तशी वाढलीच नाही. पुढील चार दिवसातही स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका राहण्याची शक्यता कमीच असल्यामुळे उमेदवारांना कार्यकर्त्यांच्या भरोशावरच गड लढवावा लागत आहे.येत्या १९ ऑक्टोबरला सायंकाळी जाहीर प्रचार थांबेल. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आपल्या विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयी रॅली काढून शहरी मतदारांना साद घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अद्याप प्रचारापासून दूर असलेल्या गावांमध्ये पोहोचण्यासाठी उमेदवारांच्या हातात केवळ ३ दिवस आहेत. अजून बऱ्याच गावांमध्ये पोहोचणे बाकी असल्यामुळे उमेदवारांची दमछाक सुरू आहे. सकाळी ८ वाजतापासून बाहेर पडणारे उमेदवार रात्री उशिरा घरी पोहोचत आहेत.गडचिरोली मतदार संघाच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस, भाजपा या प्रमुख पक्षांसह शेकाप, संभाजी ब्रिगेड, गोंडवाना गणतंत्र पार्टी या पक्षांनीही चामोर्शी तालुक्यात प्रचाराची रंगत वाढविली आहे. भोंगे व मोठे बॅनर लावलेली वाहने सर्वदूर फिरत आहे. कर्णकर्कश आवाजात सिनेगीतांच्या चालींवर आधारित गाणी लावून मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात राजकीय पक्ष यशस्वी होत आहेत. मात्र चामोर्शी तालुक्यात व शहरात कोणत्याही राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्यांची सभा अद्याप झालेली नाही. खेड्यापाड्यात पदयात्रा व कार्यकर्त्यांच्या कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत.चामोर्शी शहरात कोणत्याही पक्षाची मोठी सभा न झाल्याने कार्यकर्ते व मतदारांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात जोश निर्माण होऊ शकला नाही.काँग्रेसच्या महिला उमेदवार नवख्या असल्याने त्यांची मतदारांना अजून तोंडओळखही नाही. त्यामुळे पक्षाच्या मोठ्या नेत्याची सभा कधी होणार, असा काळजीचा सूर कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.नेतेही नाही अन् अभिनेतेही नाहीपूर्वीच्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी सिने अभिनेते, अभिनेत्री यांना हमखास आणले जात होते. त्यांचे रोड शो किंवा प्रचारसभा होत असे. त्यामुळे वातावरण निर्मितीसोबत कार्यकर्त्यांनाही जोश चढत होता. पण यावेळी कोणत्याही सिनेकलावंताला कोणत्याही पक्षाने जिल्ह्यात आणले नाही. पुढील तीन-चार दिवसात तरी एखाद्या मोठ्या नेत्याचे किंवा सिने अभिनेत्याचे दर्शन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गडचिरोली, आरमोरी, देसाईगंजातही सभा नाहीनिवडणूक आता शेवटच्या टप्प्यात असताना प्रमुख पक्षांचे स्टार प्रचारक जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी धावून आलेले नाहीत. आतापर्यंत भाजपचे नेते ना.सुधीर मुनगंटीवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या मोजक्या सभा सोडल्यास कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी या जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या शहरांमध्ये एकही प्रचारसभा झाली नसल्यामुळे मतदारांना मोठे कोडे पडले आहे. पुढील तीन दिवसात सभा होईल की नाही, याची शाश्वती नसल्याचे प्रचार कार्यालयांमधून सांगण्यात आले.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली