शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

Maharashtra Election 2019 ; ४७ उमेदवारांचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

अहेरीतही शुक्रवारचा दिवस या निवडणुकीतील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक हॉट दिवस ठरला. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा एकदा भाजपकडून माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा यांनी शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल केले. हे शक्तीप्रदर्शन पाहण्यासाठी मतदार संघातील अनेक गावचे कार्यकर्ते अहेरीत जमले होते.

ठळक मुद्देशक्तीप्रदर्शनाने गाजला दिवस : अहेरीत काँग्रेस-राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात शुक्रवारी नामांकन दाखल करण्यासाठी पक्षीय आणि अपक्ष उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. शेवटच्या दिवसपर्यंत एकूण ४७ उमेदवारांनी ७४ नामांकन दाखल केले ओत. काही प्रमुख उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत निवडणुकीचा माहौल गरम करण्याचा प्रयत्न केला. गडचिरोलीत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपापल्या पक्षाच्या प्रचार कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.अहेरीतही शुक्रवारचा दिवस या निवडणुकीतील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक हॉट दिवस ठरला. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा एकदा भाजपकडून माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा यांनी शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल केले. हे शक्तीप्रदर्शन पाहण्यासाठी मतदार संघातील अनेक गावचे कार्यकर्ते अहेरीत जमले होते. या मतदार संघात दीपक आत्राम यांना काँग्रेसचे तिकीट जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर तोडगा काढत येथे काँग्रेस-राष्ट्रवादीत मैत्रिपूर्ण लढत लढण्यावर एकमत झाले. त्यामुळे दीपक आत्राम यांनी काँग्रेसचा ए-बी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला.गडचिरोलीत भाजपकडून डॉ.देवराव होळी, काँग्रेसकडून डॉ.चंदा कोडवते, शेकापकडून जयश्री वेळदा आदी प्रमुख पक्षांसह अनेक अपक्षांनी नामांकन दाखल केले. गडचिरोली मतदार संघात १७ उमेदवारांनी २७ नामांकन भरले. आरमोरी मतदार संघात १७ उमेदवारांनी २३ तर अहेरी मतदार संघात १३ उमेदवारांनी २४ नामांकन भरले. शनिवार दि.५ रोजी अर्जांची छाननी होईल.विशेष म्हणजे, नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये अहेरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार धर्मरावबाबा यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनीही नामांकन भरले. याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष म्हणून लालसू नगोटी यांनी नामांकन भरले. मात्र वंचित बहुजन आघाडीने ज्यांना उमेदवार म्हणून पाठींबा दर्शविला होता, ते ग्रामसभेचे प्रतिनिधी सैनू गोटा यांचे नामांकन दाखल करणाऱ्यांच्या यादीत नाव नसल्यामुळे वंचितचा उमेदवार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.आरमोरी मतदार संघात शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल यांनी अपक्ष म्हणून नामांकन भरले.मुख्य मार्गावर दोन तास वाहतुकीची कोंडीविधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह एकच गर्दी केली होती. काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. बहुतांश उमेदवारांच्या रॅली इंदिरा गांधी चौक ते धानोरा मार्गावरील उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आल्या. गडचिरोली शहरात धानोरा मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक एकतर्फी आहे. अशातच रॅली निघाल्याने वाहतुकीची कोंडी झाली. जवळपास दुपारी १ वाजेपासून ३ वाजेपर्यंत अधूनमधून वाहतुकीची कोंडी होत होती. एसडीओ कार्यालयानजीकच्या बसस्थानक परिसरात चारचाकी वाहन व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. गडचिरोली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणतीही अनूचित घटना घडली नाही.कार्यकर्त्यांच्या हातात आपापल्या पक्षांचे उंचच उंच झेंडे दिसून येत होते. रॅलीदरम्यान पक्षाचा व उमेदवाराचा जयघोष केला जात होता. त्यामुळे सभोवतालचा परिसर आवाजाने दणाणून गेला होता. नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली