Maharashtra Election 2019 ; ४७ उमेदवारांचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 06:00 AM2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:31+5:30

अहेरीतही शुक्रवारचा दिवस या निवडणुकीतील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक हॉट दिवस ठरला. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा एकदा भाजपकडून माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा यांनी शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल केले. हे शक्तीप्रदर्शन पाहण्यासाठी मतदार संघातील अनेक गावचे कार्यकर्ते अहेरीत जमले होते.

Maharashtra Election 2019 ; 47 Nomination of candidates | Maharashtra Election 2019 ; ४७ उमेदवारांचे नामांकन

Maharashtra Election 2019 ; ४७ उमेदवारांचे नामांकन

Next
ठळक मुद्देशक्तीप्रदर्शनाने गाजला दिवस : अहेरीत काँग्रेस-राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात शुक्रवारी नामांकन दाखल करण्यासाठी पक्षीय आणि अपक्ष उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. शेवटच्या दिवसपर्यंत एकूण ४७ उमेदवारांनी ७४ नामांकन दाखल केले ओत. काही प्रमुख उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत निवडणुकीचा माहौल गरम करण्याचा प्रयत्न केला. गडचिरोलीत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपापल्या पक्षाच्या प्रचार कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.
अहेरीतही शुक्रवारचा दिवस या निवडणुकीतील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक हॉट दिवस ठरला. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा एकदा भाजपकडून माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा यांनी शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल केले. हे शक्तीप्रदर्शन पाहण्यासाठी मतदार संघातील अनेक गावचे कार्यकर्ते अहेरीत जमले होते. या मतदार संघात दीपक आत्राम यांना काँग्रेसचे तिकीट जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर तोडगा काढत येथे काँग्रेस-राष्ट्रवादीत मैत्रिपूर्ण लढत लढण्यावर एकमत झाले. त्यामुळे दीपक आत्राम यांनी काँग्रेसचा ए-बी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला.
गडचिरोलीत भाजपकडून डॉ.देवराव होळी, काँग्रेसकडून डॉ.चंदा कोडवते, शेकापकडून जयश्री वेळदा आदी प्रमुख पक्षांसह अनेक अपक्षांनी नामांकन दाखल केले. गडचिरोली मतदार संघात १७ उमेदवारांनी २७ नामांकन भरले. आरमोरी मतदार संघात १७ उमेदवारांनी २३ तर अहेरी मतदार संघात १३ उमेदवारांनी २४ नामांकन भरले. शनिवार दि.५ रोजी अर्जांची छाननी होईल.
विशेष म्हणजे, नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये अहेरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार धर्मरावबाबा यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनीही नामांकन भरले. याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष म्हणून लालसू नगोटी यांनी नामांकन भरले. मात्र वंचित बहुजन आघाडीने ज्यांना उमेदवार म्हणून पाठींबा दर्शविला होता, ते ग्रामसभेचे प्रतिनिधी सैनू गोटा यांचे नामांकन दाखल करणाऱ्यांच्या यादीत नाव नसल्यामुळे वंचितचा उमेदवार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरमोरी मतदार संघात शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल यांनी अपक्ष म्हणून नामांकन भरले.

मुख्य मार्गावर दोन तास वाहतुकीची कोंडी
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह एकच गर्दी केली होती. काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. बहुतांश उमेदवारांच्या रॅली इंदिरा गांधी चौक ते धानोरा मार्गावरील उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आल्या. गडचिरोली शहरात धानोरा मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक एकतर्फी आहे. अशातच रॅली निघाल्याने वाहतुकीची कोंडी झाली. जवळपास दुपारी १ वाजेपासून ३ वाजेपर्यंत अधूनमधून वाहतुकीची कोंडी होत होती. एसडीओ कार्यालयानजीकच्या बसस्थानक परिसरात चारचाकी वाहन व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. गडचिरोली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणतीही अनूचित घटना घडली नाही.
कार्यकर्त्यांच्या हातात आपापल्या पक्षांचे उंचच उंच झेंडे दिसून येत होते. रॅलीदरम्यान पक्षाचा व उमेदवाराचा जयघोष केला जात होता. त्यामुळे सभोवतालचा परिसर आवाजाने दणाणून गेला होता. नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.

Web Title: Maharashtra Election 2019 ; 47 Nomination of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.