चामोर्शी मार्गावर महाप्रसाद वितरण
By Admin | Updated: May 1, 2016 01:10 IST2016-05-01T01:10:00+5:302016-05-01T01:10:00+5:30
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी येथील चामोर्शी मार्गावर महावितरणच्या जुन्या कार्यालयासमोर महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

चामोर्शी मार्गावर महाप्रसाद वितरण
जयंती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन
गडचिरोली : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी येथील चामोर्शी मार्गावर महावितरणच्या जुन्या कार्यालयासमोर महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे व माजी प्राचार्य भैय्यासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन केले. त्याप्रसंगी डॉ. किरण मडावी, डॉ. उमेश समर्थ, सुखदेव वेठे, विकास जैन, प्रकाश ताकसांडे, नरेंद्र भरडकर, जि. प. सदस्य केशरी उसेंडी, रवी चन्नावार, समशेर पठाण आदी उपस्थित होते.
यावेळी बाबा नक्षिणे व संच यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण मुक्तावरम, सतीश विधाते, माजी नगराध्यक्ष भूपेश कुळमेथे, मनोज पवार, दिवाकर पेरकीवार, टय्या खान, अशोक चलाख, अनिल सादुलवार, दिलीप चौधरी, दिगंबर रामटेके, रेमणी भैसारे, धुलीचंद जांगीर, अंकुश खांडरे, गणेश डोंगे यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)