मार्कंङेश्वराला महाजलाभिषेक

By Admin | Updated: July 16, 2014 00:10 IST2014-07-16T00:10:55+5:302014-07-16T00:10:55+5:30

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे मार्र्कंडेश्वर मंदिरात महाजलाभिषेक सोमवारी करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Mahakalabhishek to Markandeshwar | मार्कंङेश्वराला महाजलाभिषेक

मार्कंङेश्वराला महाजलाभिषेक

मार्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे मार्र्कंडेश्वर मंदिरात महाजलाभिषेक सोमवारी करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
१३ जुलै रोजी रविवारी रात्री ९.४५ वाजता घटस्थापना करण्यात आली. रात्रभर भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सोमवारी सकाळी ७ वाजता हजारो भाविक दींडी घेऊन वैनगंगेच्या तिरावर पोहोचले. त्यानंतर वैनगंगेत भाविकांनी पवित्र स्नान केल्यावर वैनगंगा मातीची पूजा करण्यात आली. पाच जोडप्यांनी वैनगंगेचे जलपूजन करून मार्र्कंडेश्वरला अभिषेक घातला. पावणेआठ वाजताच्या सुमारास जलाभिषेक कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी सखुबाई लव्हाजी आभारे, छाया छबीलदास सुरपाम, माया रामचंद्र शेंडे, कमल माधव जुनघरे, जिजाबाई जीवन झाडे यांच्या हस्ते महाजलाभिषेकाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी पं.स. सदस्य नेमचंद भिवनकर, मार्र्कंडाच्या सरपंच ललिता मरसकोल्हे, जलाभिषेक समितीचे प्रमुख प्रकाश आभारे, दामोधर जुनघरे, राजू मोेगरे, विठ्ठल सरपे व मार्र्कंडाचे नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मार्र्कंडादेव गावातील नागरिकांसह फराडा, मोहुर्ली, धारगाव, रामाळा, फोकुर्डी आदी २५ गावातील भक्तगण उपस्थित होते. या कार्यक्रमाच्यावेळी पोलीस उपनिरिक्षक भास्कर हुर्रे यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)

Web Title: Mahakalabhishek to Markandeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.