महाज्याेतीतर्फे आता मागास विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षेचे माेफत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:41 IST2021-08-25T04:41:23+5:302021-08-25T04:41:23+5:30
गडचिराेली : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाज्याेती’च्या वतीने ओबीसी, भटक्या जाती, जमाती, विशेष मागास विद्यार्थ्यांना सन २०२३च्या जेईई, एम.एच.सीईटी व ...

महाज्याेतीतर्फे आता मागास विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षेचे माेफत प्रशिक्षण
गडचिराेली : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाज्याेती’च्या वतीने ओबीसी, भटक्या जाती, जमाती, विशेष मागास विद्यार्थ्यांना सन २०२३च्या जेईई, एम.एच.सीईटी व नीट या स्पर्धा परीक्षेसाठी माेफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले व इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी प्राप्त आहेत.
बारावीच्या परीक्षेनंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेची तयार करण्याकरिता सर्वसामान्य, गरीब विद्यार्थ्यांना महागडे काेचिंग क्लास लावणे शक्य हाेत नाही. अशा सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाज्याेतीने उपक्रम हाती घेतला आहे. महाज्याेतीतर्फे स्पर्धा परीक्षेचे ऑनलाइन माेफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी माेफत पुस्तके, माेफत टॅबसाेबतच दरराेज सहा जी.बी.इंटरनेट डेटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महाज्याेतीचे संचालक डाॅ.बबनराव तायवाडे व प्रा.शेषराव येलेकर यांनी दिली आहे.
बाॅक्स....
अर्ज करण्यासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदत
महात्मा ज्याेतिबा फुले संशाेधन व प्रशिक्षण संस्था महाज्याेती नागपूरच्या वतीने ऑनलाइन स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम मुदत २५ सप्टेंबर, २०२१ आहे. सदर प्रशिक्षणाकरिता शहरी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला यंदाच्या दहावीच्या परीक्षेत ७० टक्के तर ग्रामीण, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. साेबत ओबीसी, भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्ग व नाॅनक्रिमिलिअरचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी महाज्याेतीच्या वेबसाइटवर आपला प्रवेश अर्ज अपलाेड करून माेफत प्रशिक्षण याेजनेचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.