शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
2
सभांऐवजी शाखा भेटींवर भर, ठाकरे बंधूंची हटके रणनीती; 'शिवतीर्था'वर ११ तारखेला उद्धव-राज गर्जना
3
VIDEO: बॉलीवूड अभिनेत्री संतापली! प्रचार रॅलीतील फटाक्यांमुळे घराला आग, कार्यकर्त्यांना सुनावलं
4
अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा राहुल नार्वेकरांवर धक्कादायक आरोप; 'बिनविरोध'साठी घडला थरार?
5
"हिंदुत्व विरोधी काँग्रेसची भाजपानं घेतली साथ, आता महापालिकेत परिणाम भोगा" शिंदेसेना संतप्त
6
महापुरुषांच्या फोटोसमोर महिलेला नाचवलं, उद्धवसेनेकडून 'तो' व्हिडिओ ट्विट; भाजपाचा पलटवार
7
Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागांत ७ तास पाणीपुरवठा राहणार बंद
8
केंद्र सरकारचा 'X' ला शेवटचा इशारा! 'Grok AI' मधील अश्लील मजकूर हटवण्यासाठी दिली डेडलाइन
9
अजबच! इथे भाजपाने चक्क काँग्रेससोबत केली युती, मित्रपक्षाला बाहेर ठेवण्यासाठी जुळवलं समीकरण 
10
"वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी..."; देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड मत
11
Video: अपघाताने हात हिरावले, पण स्वप्ने नाही; रत्ना तमंगची कहाणी ऐकून जजेस झाले भावूक..!
12
खरंच किंग कोहलीनं पळ काढला? संजय मांजरेकरांचं कसोटीतील ‘विराट’ निवृत्तीवर मोठं वक्तव्य, म्हणाले…
13
भारत फिरायला आली अन् 'इथलीच' होऊन गेली; चक्क ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात पडली परदेशी तरुणी!
14
एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?
15
'गजवा-ए-हिंद'साठी पाक फौजा तयार, लष्कर ए तैयबाने पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ, थेट मोदींना धमकी
16
फक्त एका कुपनच्या जोरावर जगाला लुटणारा 'महाठग'; आजही त्याच मॉडेलवर चालतात मोठमोठे स्कॅम
17
युद्ध पेटणार? US विरोधात ७ देश एकवटले, ट्रम्प यांना केले सतर्क; ग्रीनलँडला दिली होती धमकी
18
साखरपुडा झाला, पूजेसाठी घरी आला आणि होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला; छत्रपती संभाजीनगरमधील तरुणावर गुन्हा
19
बंटी जहागीरदार कुठे पोहोचला? हत्या करणाऱ्यांना लोकेशनची माहिती देणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी कसे शोधले?
20
काहीही केलं तरी वजन कमीच होईना... 'रताळं' ठरेल सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जवानांचा ‘महास्ट्राईक’ ! सुकमा- बिजापूर सीमेवर १४ माओवादी ठार

By संजय तिपाले | Updated: January 3, 2026 13:36 IST

नववर्षाच्या तिसऱ्याच दिवशी माेठी कारवाई : कोंटा एरिया कमिटी सचिव ‘मंगडू’चा समावेेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलांनी ३ जानेवारी रोजी माओवाद्यांना मोठा धक्का दिला आहे. सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील जंगलात पहाटे राबविलेल्या मोहिमेत १४ माओवादी ठार झाले. सुकमा जिल्ह्यात १२, तर बिजापूर जिल्ह्यात २  मृतदेह हाती लागले असून, मृतांमध्ये कोंटा एरिया कमिटी सचिव ‘मंगडू’चा समावेेश आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे डीआरजी  पथकांनी शुक्रवारी पहाटे शोधमोहीम सुरू केली होती. पहाटे सुमारे ५ वाजता बिजापूर जिल्ह्यात पहिली चकमक उडाली. त्यानंतर सकाळी ८ च्या सुमारास सुकमा जिल्ह्यात माओवादी आणि जवानांमध्ये जोरदार गोळीबार झाला. घनदाट जंगल आणि डोंगरदऱ्यांचा आधार घेत माओवाद्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र सुरक्षा दलांच्या चोख प्रत्युत्तरामुळे त्यांचा डाव फसला. चकमकीत ठार झालेल्यांत जहाल माओवादी वेट्टी मुका उर्फ मांगडू याचा समावेश आहे. तो सुकमाच्या गोगडू गावचा रहिवासी असून अनेक वर्षांपासून चळवळीत सक्रिय होता. घातक माओवादी म्हणून त्याची ओळख होती, त्याच्यावर तेथील सरकारने आठ लाखांचे इनाम जाहीर केले होते. उर्वरित माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु असून  ठार झालेल्यांत आणखी काही मोठ्या कॅडरचे माओवादी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

एके-४७ सह शस्त्रसाठा हस्तगत

चकमक संपल्यानंतर करण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये आतापर्यंत १४ माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. माओवाद्यांकडून एके-४७, इन्सास आणि एसएलआर सारख्या घातक रायफल्ससह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. 

मोहीम अजूनही सुरू

सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या माहितीनुसार, परिसरात अजूनही काही नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता आहे. जवानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोहिमेचे ठिकाण गोपनीय ठेवण्यात आले असून, कारवाई अद्याप सुरूच आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Security forces eliminate 14 Maoists in Sukma-Bijapur border operation.

Web Summary : Security forces inflicted a major blow to Maoists in Chhattisgarh's Bastar region, killing 14 in a Sukma-Bijapur border operation. The deceased include a key Maoist leader. AK-47s and other weapons were seized. The operation is ongoing.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली