मडके, उईके नवे नगराध्यक्ष
By Admin | Updated: July 14, 2014 23:57 IST2014-07-14T23:57:23+5:302014-07-14T23:57:23+5:30
जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिकांच्या अध्यक्ष पदाची निवडणूक सोमवारी पार पडली. गडचिरोलीच्या नगराध्यक्षपदी युवाशक्ती आघाडीच्या निर्मला मडके, तर देसाईगंजच्या

मडके, उईके नवे नगराध्यक्ष
चौधरी, कुकरेजा उपाध्यक्ष : गडचिरोली, देसाईगंमध्ये अविरोध
गडचिरोली/देसाईगंज : जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिकांच्या अध्यक्ष पदाची निवडणूक सोमवारी पार पडली. गडचिरोलीच्या नगराध्यक्षपदी युवाशक्ती आघाडीच्या निर्मला मडके, तर देसाईगंजच्या नगराध्यक्षपदी भाजपचे शाम उईके अविरोध निवडून आले. गडचिरोली न.प.च्या उपाध्यक्षपदी पुन्हा रमेश चौधरी तर देसाईगंज न.प.च्या उपाध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते नगरसेवक मोतीलाल कुकरेजा विराजमान झाले आहेत.
गडचिरोली पालिकेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होते. तर देसाईगंज पालिकेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. गडचिरोली पालिकेत अध्यक्ष पदासाठी निर्मला भाऊसाहेब उर्फ दीपक मडके तर देसाईगंज पालिकेत अध्यक्षपदासाठी शाम उईके यांचा एकमेव नामाकंन अर्ज दाखल करण्यात आला होता. सोमवारी दोन्ही पालिकेत झालेली अध्यक्षपदाची निवडणूक अविरोध पार पडली. गडचिरोली पालिकेत उपाध्यक्षपदासाठी माजी उपाध्यक्ष रमेश चौधरी यांचा एकमेव नामाकंन अर्ज सादर करण्यात आला होता. तर देसाईगंज पालिकेत मोतीलाल कुकरेजा यांचा नामाकंन अर्ज दाखल करण्यात आला होता. सोमवारी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गडचिरोली पालिकेच्या अध्यक्षपदी निर्मला भाऊसाहेब मडके तर उपाध्यक्षपदी रमेश चौधरी यांची अविरोध निवड करण्यात आली. देसाईगंज पालिकेत अध्यक्षपदी शाम पुंडलिक उईके तर उपाध्यक्षपदी मोतीलाल कुकरेजा यांची अविरोध निवड करण्यात आली. गडचिरोली येथे पिठासीन अधिकारी म्हणून गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर, नगर परिषदचे मुख्याधिकारी रविंद्र ढाके यांनी काम पाहिले. देसाईगंज पालिकेत निवडणूक पिठासीन अधिकारी म्हणून देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी राऊत, तहसीलदार अजय चरडे, मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी काम पाहिले.
गडचिरोली नगर पालिकेत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष बैठकीला नगरसेवक प्रा. राजेश कात्रटवार, आनंद श्रुंगारपवार, विजय गोरडवार, सुरेश पोरेड्डीवार, माधुरी खोब्रागडे, अॅड. बाळासाहेब उर्फ प्रशांत आखाडे, चेतना ठाकरे आदी गैरहजर होते. दोनही ठिकाणी नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे नगरसेवकांनी अभिनंदन केले. शहराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली. (स्थानिक प्रतिनिधी)