म. गांधी काॅलेजमध्ये वनमाळी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:32 IST2021-02-15T04:32:22+5:302021-02-15T04:32:22+5:30

आरमाेरी : मनाेहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. वामनराव वनमाळी यांच्या १५व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सर्व विद्याशाखांच्या वतीने १३ ...

M. Greetings to Vanmali at Gandhi College | म. गांधी काॅलेजमध्ये वनमाळी यांना अभिवादन

म. गांधी काॅलेजमध्ये वनमाळी यांना अभिवादन

आरमाेरी : मनाेहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. वामनराव वनमाळी यांच्या १५व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सर्व विद्याशाखांच्या वतीने १३ फेब्रुवारी राेजी महाविद्यालयात घेण्यात आला. यावेळी वनमाळी यांना अभिवादन करण्यात आले. वनमाळी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळाचे सचिव मनाेज वनमाळी हाेते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्ष सुनीता वनमाळी, नूरअल्ली पंजवानी, दीपक बेहरे, दीपक वनमाळी, हरिश्चंद्र बाेंदरे, नामदेव साेरते, उमाकांत वनमाळी, श्रीहरी नवघरे, मयूर वनमाळी, गणपतराव वडपल्लीवार, नादीरभाई पंजवानी, प्राचार्य डाॅ. लालसिंग खालसा, उपप्राचार्य आंबाेरकर, मुख्याध्यापक के. टी. किरणापुरे, प्राचार्य कासार आदी मान्यवर उपस्थित हाेते. संचालन व आभार प्रा. दीपक गाेंडाणे यांनी मानले. यावेळी सर्वांनी माैन पाळून स्व. वनमाळी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: M. Greetings to Vanmali at Gandhi College