लोकमान्य गणेशोत्सवाला यावर्षी खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:20 IST2017-08-29T00:19:46+5:302017-08-29T00:20:08+5:30

गणेशोत्सवातून विविध सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकून त्यातून जनजागृती व्हावी ...

Lost Lokmanya Ganesh Festival this year | लोकमान्य गणेशोत्सवाला यावर्षी खो

लोकमान्य गणेशोत्सवाला यावर्षी खो

ठळक मुद्देयंत्रणाच अनभिज्ञ : अधिकाºयांचे कानावर हात, मंडळांच्या कार्यकर्त्याचा हिरमोड

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गणेशोत्सवातून विविध सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकून त्यातून जनजागृती व्हावी यासाठी गेल्यावर्षी शासनाने गणेशोत्सवाची परंपरा सुरू करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे ‘लोकमान्य गणेशोत्सव स्पर्धा’ ठेवली होती. पण यावर्षी सरकारी यंत्रणाच त्यापासून अनभिज्ञ असल्यामुळे शासनाने हा उपक्रम एका वर्षातच गुंडाळला असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून ही लोकमान्य गणेशोत्सव स्पर्धा गेल्यावर्षी घेतली होती. त्यात स्त्री भृण हत्या, हागणदारीमुक्त गाव, तंटामुक्त गाव, वृक्ष लागवड, पाण्याची बचत अशा विविध सामाजिक जागृतीसाठी उत्कृष्ट देखावा सादर करणाºया गणेश मंडळांना तालुका व जिल्हा स्तरावर पुरस्कृत करण्यात आले होते. त्यामुळे गणेश मंडळांचा उत्साह वाढून यावर्षीही अनेक मंडळांनी विविध देखाव्यांसाठी तयारी केली होती. मात्र सदर स्पर्धेसाठी अर्ज घेण्यासाठी सरकारी यंत्रणाच तयार नसल्यामुळे मंडळांचा हिरमोड झाला आहे.
गेल्यावर्षी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यामार्फत सदर उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला होता. त्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजीही केली होती. मात्र यावर्षी लोकमान्य गणेशोत्सव स्पर्धेचे नावही कोणी घेतले नाही. याबद्दल शिक्षणाधिकारी आत्राम यांना विचारले असता त्यांनी यावर्षी स्पर्धा घेण्यासंदर्भात सूचना नसल्याचे सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी दुर्गेश सोनवाने यांनीही ही स्पर्धा यावर्षी घेण्यात येत असल्याबद्दल अनभिज्ञता दर्शविली. ज्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून ही स्पर्धा गेल्यावर्षी घेतली होती त्यांच्या मुंबई कार्यालयाकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तेथील फोन कॉल स्वीकारलाच नाही.
म्हणे स्पर्धा गोपनीय होणार!
कळस म्हणजे या स्पर्धेबाबत कोणाचाच पायपोस कोणात नसताना आणि मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणीसाठी गेलेल्या मंडळांना वेगळीच माहिती मिळाली. सदर स्पर्धेसंदर्भात त्यांनी तिथे अर्ज भरायचा का, अशी विचारणा केली असता त्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र यावर्षी ही स्पर्धा गोपनियपणे होणार अशी खोटी माहिती कोणीतरी देऊन मंडळांच्या संभ्रमात भर पाडली.

वास्तविक ही स्पर्धा घेणे आमच्या विभागाचे काम नाही. गेल्यावर्षी वरिष्ठ स्तरावरून त्याबाबत आदेश आल्यामुळे आम्ही ती राबविली. पण यावर्षी कोणीही काही सांगितले नाही. कदाचित दुसºया कोणत्या विभागाकडे ही जबाबदारी सोपविली असेल म्हणून आमच्या गटशिक्षणाधिकाºयांनी मंडळांचे अर्ज स्वीकारले नाहीत.
- नानाजी आत्राम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, गडचिरोली

Web Title: Lost Lokmanya Ganesh Festival this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.