शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यातील रौनक मावळली

By admin | Updated: February 5, 2016 01:06 IST

सर्वाेच्च न्यायालयाने शंकर पटावर बंदी घातल्यामुळे पूर्व विदर्भातील ग्रामीण भागातील अर्थकारणावरही मोठा परिणाम झाला असून ...

शंकरपट बंदीचा परिणाम : १५० वर्षे जुने पट बंदच; शौकिनांत निरुत्साहकुरखेडा : सर्वाेच्च न्यायालयाने शंकर पटावर बंदी घातल्यामुळे पूर्व विदर्भातील ग्रामीण भागातील अर्थकारणावरही मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागात शंकरपटाच्या निमित्ताने पाहावयास मिळणारा उत्साह आता पर्णत: मावळला आहे. मागील दोन वर्षांपासून न्यायालयाने शंकर पटावर बंदी घातली आहे. त्यामुळे शंकरपटासाठी तयार करण्यात येणारे बैल आता नांगर व बंडीला जुंपावे लागत आहे. यावर्षाच्या सुरूवातीला केंद्र सरकारने शंकर पटाला मंजुरी प्रदान केली होती. त्यामुळे पट शौकिनांमधला उत्साह दुणावला होता. परंतु ‘पेटा’ ही संघटना पुन्हा न्यायालयात गेल्याने न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातली आहे. पूर्वी पटासाठी खास बैल तयार केले जात होते. खरिपाचा धान निघाल्यावर शेतकरी शंकर पटाच्या आयोजनासाठी लागायचे. या पटाकरिता बैलांना तयार केल्यावर त्यांचे नामकरणही करण्यात येत होते. झाडीपट्टीत पटासाठी तयार होणाऱ्या बैलांना वाघ्या, चेंडू, झेंडू, मिरची, ससा, माळी, हरण्या, सरण्या, शेर, डुकऱ्या अशी नावेही दिली जायची. अनेक पट शौकिनांच्या तोंडी ही नावे घर करून असायची. शंकर पटात वापरला जाणार छकडा पटाच्या हंगामापूर्वी दुरूस्त केला जायचा. ऐरवी घराच्या आडोश्याला अडकवून ठेवलेला छकडा पटाच्या निमित्ताने काढून त्याची चाके दुरूस्त केली जायची. जिल्ह्यात विशेषत: मकरसंक्रांतीनंतर पटाच्या हंगामाला सुरूवात होत असल्याने अनेक ठिकाणच्या नावाजलेल्या पटांमध्ये जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातीलही पट शौकीन बैलजोड्यांसह दाखल व्हायचे. कुरखेडा तालुक्यातील कोलारी, मासळ, मोजी किन्ही, साकोली, निलागोंदी आदी गावांमध्ये १५० वर्षांपासून शंकरपट भरविला जात होता. पटामध्ये जिंकणाऱ्या जोडीला बक्षीस मिळत होते. परंतु आता शंकर पटांवर न्यायालयाने बंदी घातल्याने पट शौकिनांच्या आनंदावर विरजन पडले आहे. (शहर प्रतिनिधी)