लोकमत सखी सन्मान अवॉर्ड
By Admin | Updated: October 10, 2016 00:59 IST2016-10-10T00:59:47+5:302016-10-10T00:59:47+5:30
लोकमत सखी मंच तर्फे सखींच्या कार्यांचा सन्मान करण्यासाठी लोकमत सखी गौरव अवॉर्डचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत सखी सन्मान अवॉर्ड
सखींच्या कार्याचा सन्मान: १५ पर्यंत अर्ज पाठवा
गडचिरोली : लोकमत सखी मंच तर्फे सखींच्या कार्यांचा सन्मान करण्यासाठी लोकमत सखी गौरव अवॉर्डचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्रदीपक सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या असाधारण कर्तृत्वाचा गौरव व प्रसिध्दीपासून दूर असलेल्या महिलांच्या कार्याला जगासमोर आणण्याचा प्रयत्न या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो. या वर्षी लोकमत सखी गौरव अवॉर्ड सात क्षेत्रात विभागून देण्यात येणार आहे. यात सामाजिक, साहित्य व कला, क्रीडा, उद्योग व व्यवसाय, शैक्षणिक, वैद्यकीय व शौर्य आदी क्षेत्रांचा समावेश आहे.
यापैकी कुठल्याही एका क्षेत्रात जर उल्लेखनीय कार्य केले असेल तर त्याची संपूर्ण माहिती आपल्या रंगीत छायाचित्रासह लोकमत जिल्हा कार्यालय गडचिरोली येथे १५ आॅक्टोबर २०१६ पर्यंत जमा करावे. पाठविलेल्या माहितीत आपण कार्य केलेल्या क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख करावा. आपल्या कार्याचा निश्चितच गौरव केला जाईल.
आपण पाठवलेल्या अर्जाचे तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण केले जाईल. यात निवड झालेल्यांना शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अधिक माहितीकरिता लोकमत सखी मंच संयोजिका प्रीती मेश्राम (९५९५४३२९८८), बालविकास मंच संयोजिका किरण पवार (८००७१०९३१०), युवा नेक्स्ट संयोजिका वर्षा पडघन (९४२१००३९४९) लोकमत कार्यालय त्रिमूर्ती चौक, गडचिरोली येथे संपर्क साधावा. (नगर प्रतिनिधी)