लोकमत सखी मंचच्या वतीने जिल्हाभर विविध कार्यक्रम
By Admin | Updated: March 5, 2016 01:30 IST2016-03-05T01:30:28+5:302016-03-05T01:30:28+5:30
लोकमत सखी मंच देसाईगंज शाखेच्या वतीने गणेश मंदिरामध्ये विविध गेम स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी लकी ड्रा काढण्यात आला.

लोकमत सखी मंचच्या वतीने जिल्हाभर विविध कार्यक्रम
गडचिरोली, चामोर्शी, अहेरी येथे कार्यक्रम होणार : देसाईगंज येथे नव्या सदस्यांना भेट वस्तू वितरित
देसाईगंज : लोकमत सखी मंच देसाईगंज शाखेच्या वतीने गणेश मंदिरामध्ये विविध गेम स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी लकी ड्रा काढण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहल दीपक जाधव होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून माधुरी शालिग्राम, रूपाली मांडवे, विसोराच्या पोलीस पाटील सहारे आदी उपस्थित होत्या. यावेळी लकी ड्रा काढण्यासाठी नानककुमार शामदासानी स्वत: उपस्थित होते. ५०-५० सदस्यांमधून दोन लकी ड्रा काढण्यात आले. प्रीती ज्ञानेश्वर पगाडे, निकत जाकीर बेग यांना पद्म प्रतिष्ठान देसाईगंजच्याकडून दोन साड्या भेट देण्यात आल्या. विविध गेम स्पर्धेत आरती विशाल भुते प्रथम, करूणा विजय दुनेदार यांना द्वितीय पुरस्कार सखी मंचकडून देण्यात आला. संचालन अर्चना सूर्यप्रकाश गभणे यांनी तर प्रास्ताविक तालुका संयोजिका कल्पना सुरेश कापसे यांनी केले. आभार रविना अविनाश बंडावार यांनी मानले. कार्यक्रमासाठी वैशाली शेबे, राधिका पत्रे, वनिता नाकतोडे, मीना भरद्वार, रेखा नाकाडे, चांदेवार, पल्लवी कुंभलवार, शैली कुंभलवार, उईके, मधुरा गभणे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
चामोर्शी सखी मंचच्या वतीने ९ ला रक्तदान शिबिर
चामोर्शी सखी मंचच्या वतीने ग्रामीण रूग्णालयात ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. रक्तदानाव्यतिरिक्त रक्तगट, रक्तदाब तसेच सखींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात ज्या सखींना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आपली नावे कविता बंडावार, मंगला कोहळे, प्रीती भोगावार, अमृता आर्इंचवार, नीलिमा वासेकर, अनिता बोकडे, अर्चना नारदासवार, ममता गौरकर यांच्याकडे द्यावीत व जास्तीत जास्त संख्येने सखी सदस्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका संयोजिका चैताली चांदेकर (९४०४८२७७१०), सहसंयोजिका वैशाली भांडेकर, शीला आलुरवार यांनी केले आहे.