शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Lok Sabha Election 2019; बाहेरच्या १० हजार जवानांनी दिली सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:17 AM

मतदान शांततेत पार पडावे, यासाठी राज्यभरातून सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी व ४०० अधिकारी बोलविण्यात आले होते. जिल्ह्यात १० हजार पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ जवान तैनात आहेत. बाहेरचे व जिल्ह्यातील असे एकूण जवळपास २० हजार पोलीस जवानांनी निवडणुकीदरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळली.

ठळक मुद्देमतदानाच्या दिवशी नेमणूक : ४०० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मतदान शांततेत पार पडावे, यासाठी राज्यभरातून सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी व ४०० अधिकारी बोलविण्यात आले होते. जिल्ह्यात १० हजार पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ जवान तैनात आहेत. बाहेरचे व जिल्ह्यातील असे एकूण जवळपास २० हजार पोलीस जवानांनी निवडणुकीदरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळली. त्यामुळे अपवादात्मक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास निम्मे मतदान केंद्र नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. या मतदान केंद्रांवर मतदान घेणे प्रशासनासाठी मोठे आव्हान आहे. हे आव्हान प्रत्येक निवडणुकीच्या वेळी स्विकारून निवडणुका शांततेत पार पाडल्या जातात.नक्षल्यांच्या बिमोड करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १० हजार पोलीस, एसआरपीएफ, सीआरपीएफचे जवान व अधिकारी तैनात आहेत. मात्र निवडणुकीच्या कालावधीत प्रत्येक मतदान कर्मचाऱ्यांच्या पथकाला सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी लागते. त्यांना जंगलातून मतदान केंद्रापर्यंत नेणे व सुखरूप परत आणणे ही जबाबदारी पोलीस जवानांना स्विकारावी लागते. दुर्गम भागातील एका पथकाच्या मागे किमान २५ ते ३० तर वेळप्रसंगी ५० जवान उपलब्ध करून दिले जातात. लोकसभेच्या वेळी जिल्हाभरात एकाच वेळी मतदान होत असल्याने जिल्ह्यात जरी १० हजार पोलीस असले तरी हा पोलीस दल कमी पडतो. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी व सुमारे ४०० अधिकारी बोलविण्यात आले होते. १० हजार कर्मचाºयांमध्ये प्रशिक्षण घेणाºया महिला पोलीस, होमगार्ड यांचाही समावेश होता. मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी या जवानांना गडचिरोली जिल्ह्यात डेरेदाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना मतदानाच्या अगोदरच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले. या कर्मचाºयांच्या सहकार्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील यावर्षीची लोकसभेची निवडणूक अपवाद वगळता अतिशय शांततेत पार पडली.गडचिरोलीकरांनीही आपलेसे करून घेतलेगडचिरोली शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर बाहेरच्याच पोलीस कर्मचारी व अधिकाºयांची नेमणूक केली होती. त्यांची बोलीभाषा व चेहºयावरून ओळख पटत होती. सगळीकडे बाहेरचेच पोलीस कर्मचारी दिसत असल्याने निवडणुकीसाठी त्यांची नेमणूक झाली असल्याचा अंदाज गडचिरोलीकरांना आला. काही मतदारांनी जवानांचे नाव, गाव विचारून तेथील राजकीय परिस्थिती विचारली. यातून भावनिक नाते निर्माण होण्यास मदत झाली. हे सर्व कर्मचारी तीन ते चार दिवस गडचिरोली येथे थांबले होते. निवडणुकीच्या दुसºया दिवशी या सर्वांना निरोप देण्यात आला. या सर्व कर्मचाºयांना स्वतंत्र बसने गडचिरोली येथे आणण्यात आले होते.शहरी भागातील मतदान केंद्रांवर नेमणूकनक्षलग्रस्त भागातून प्रवास करताना पोलीस कर्मचाºयांना युध्द कौशल्य वापरावे लागते. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या पोलीस जवानांना हे कौशल्य प्राप्त नाही. तसेच त्यांना येथील भौगोलिक, सांस्कृतिक व नक्षलवादाविषयी माहिती नाही. त्यामुळे त्यांची दुर्गम भागात नियुक्ती करणे धोक्याचे ठरले असते. ही बाब लक्षात घेऊन नवख्यांना गडचिरोली, देसाईगंजा, चामोर्शी, आरमोरी यासारख्या तालुकास्तरावर नेमणूक देण्यात आली. त्यांच्या बोलीभाषेवरून ते कोकण, मराठवाडा येथील असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019