शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

लॉकडाऊनमध्ये गंभीर गुन्ह्यात २३ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:00 AM

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनच्या कालावधीत देशभरातील व्यापार, उद्योग, कारखाने, दुकाने, बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, वाहतुकीची साधने बंद होती. अत्यावश्यक काम वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यासही प्रतिबंध घालण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे देशाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असले तरी त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांचे प्रमाण घटले असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत कमतरता : घरी राहत असल्याचा परिणाम; मार्च व एप्रिल महिन्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनामुळे मार्चच्या शेवटी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. गेल्यावर्षी याच काळातील गुन्ह्यांची तुलना केल्यास गंभीर गुन्हे २३ टक्क्यांनी घटल्याचे पोलीस विभागाने घेतलेल्या नोंदीवरून दिसून येते. असे असले तरी पोलिसांवरचा ताण मात्र कायम असून त्यांना विविध पातळ्यांवर ड्युटी करावी लागत आहे.कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनच्या कालावधीत देशभरातील व्यापार, उद्योग, कारखाने, दुकाने, बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, वाहतुकीची साधने बंद होती. अत्यावश्यक काम वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यासही प्रतिबंध घालण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे देशाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असले तरी त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांचे प्रमाण घटले असल्याचे दिसून येते. खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी आदी गुन्हे गंभीर स्वरूपाचे मानले जातात. मार्च २०१९ मध्ये अशा प्रकारचे ३४ तर एप्रिल २०१९ मध्ये १८ असे एकूण ५२ गुन्हे घडले होते. मार्च २०२० मध्ये १८ तर एप्रिलमध्ये २४ गुन्हे असे एकूण ४२ गुन्हे घडले आहेत. मागील वर्षीच्या मार्च व एप्रिल महिन्यामधील गुन्ह्यांची या वर्षातील याच महिन्यांतील गुन्ह्यांशी तुलना केली असता, गुन्ह्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले असल्याचे दिसून येते. मार्च व एप्रिल २०२० मध्ये खुनाचे चार गुन्हे, खुनाच्या प्रयत्नाचे सात गुन्हे, बलात्काराचे सात गुन्हे, घरफोडी सहा, तर चोरीचे १८ गुन्हे घडल्याची नोंद पोलीस विभागाकडे आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश नागरिक घरीच राहात होते. तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात व्यस्त राहात होते. त्याचबरोबर घराबाहेर पडल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असल्याने नागरिक सहजासहजी घराबाहेर पडत नव्हते.उन्हाळ्याच्या कालावधीत मुलांना सुट्या राहात असल्याने काही नागरिक फिरण्यासाठी जातात. या संधीचा गैरफायदा उचलून उन्हाळ्यामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होते. यावर्षी मात्र नागरिक घरीच असल्याने घरफोडीच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येते.विनयभंग, दारूबंदीच्या कारवाया वाढल्याइतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी असले तरी विनयभंगाच्या घटनांमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ झाली असल्याचे दिसून येते. यावर्षी विनयभंगाच्या मार्चमध्ये १० तर एप्रिलमध्ये ७ अशा एकूण १७ घटना घडल्या. तर मागील वर्षी मार्चमध्ये विनयभंगाच्या ३ आणि एप्रिलमध्ये केवळ एकच घटना घडली होती.गेल्यावर्षी मुंबई दारूबंदी कायद्यान्वये मार्च महिन्यात १३४ तर एप्रिल महिन्यात ८६ गुन्हे दाखल करण्यात आले. यावर्षी लॉकडाऊनच्या काळात दारूबंदीच्या कारवाया वाढल्या. मार्च महिन्यात १५१ तर एप्रिल महिन्यात दारूबंदीच्या १६७ कारवाया करून गुन्हे नोंदविण्यात आले.गेल्यावर्षी मे महिन्यात ११४ गुन्हे दाखलमागील वर्षी मे महिन्यात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, घरफोडी, चोरी, विश्वासघात, ठकबाजी, दुखापत, विनयभंग, हयगयीच्या कृत्याने मृत्यू आदी घटनासंदर्भात ११४ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ७८ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आले. जुगार प्रतिबंधक कायदा, मुंबई दारूबंदी कायदा व इतर भादंवि अन्वये १० गुन्हे असे एकूण ७७ गुन्हे दाखल केले. यावर्षी संपूर्ण मे महिनाभर लॉकडाऊन सुरू होते. त्यामुळे नागरिकांच्या फिरण्यावर काही प्रमाणात प्रतिबंध होता. मे महिन्याचा गोषवारा पोलीस विभागाकडे उपलब्ध झाला नसला तरी मे महिन्यातील गुन्ह्यांमध्येही यावर्षी मोठी घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस