महावितरणच्या कार्यालयांसमाेर कुलूप ठाेकाे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST2021-02-06T05:00:00+5:302021-02-06T05:00:27+5:30
काेराेनाकाळातील वीजबिल माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले हाेते, मात्र वीजबिल माफ केले नाही. तसेच महावितरणतर्फे थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जात आहे. याविराेधात जिल्हाभरातील महावितरणच्या कार्यालयांसमाेर भाजप पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. तर काही कार्यालयांना कुलूपही ठाेकण्यात आले. तसेच वीज विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

महावितरणच्या कार्यालयांसमाेर कुलूप ठाेकाे आंदाेलन
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाकाळातील वीजबिल माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले हाेते, मात्र वीजबिल माफ केले नाही. तसेच महावितरणतर्फे थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जात आहे. याविराेधात जिल्हाभरातील महावितरणच्या कार्यालयांसमाेर भाजप पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. तर काही कार्यालयांना कुलूपही ठाेकण्यात आले. तसेच वीज विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.
गडचिराेली येथील इंदिरा गांधी चाैकात हल्लाबाेल आंदाेलन करण्यात आले. तसेच महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठाेकण्यात आले. यावेळी आ. डाॅ. देवराव होळी, नगराध्यक्ष याेगीता पिपरे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, नगरसेवक रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, युवामोर्चा महामंत्री मधुकर भांडेकर, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे, न.प. बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, विलास भांडेकर, नगरसेवक अल्का पोहनकर, लता लाटकर, देवाजी लाटकर, नीता उंदीरवाडे, श्यामराव वाढई, नरेश हजारे, सिद्धार्थ नंदेश्वर, राजू शेरकी, मोरेश्वर भांडेकर, जनार्दन भांडेकर, नरेंद्र भांडेकर, राकेश राचमलवर, जावेद अली, विठोबा झरकर आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.
चामाेर्शी
येथील महावितरणच्या कार्यालयास आ. डाॅ. देवराव हाेळी यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात आले. कार्यालयाला कुलूप ठाेकून सरकार व महावितरणच्या विराेधात निदर्शने करण्यात आली. आ.हाेळी यांनी स्वत: फाटकाला कुलूप ठाेकून नारेबाजी केली.
महाविकास आघाडी सरकार आणि वीज मंत्री यांचा यावेळी निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रा. रमेश बारसागडे , भाजप पंचायत समिती सभापती भाऊराव डोर्लीकर, जिल्हा सचिव आनंद गण्यारपवार, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, नगरपंचायतचे गटनेते प्रशांत येगलोपवार, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशिष पिपरे, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, विनोद गौरकर, राजू चुधरी, संजय खेडेकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतीक राठी, युवा नेते वासुदेव चिचघरे, रामचंद्र वरवाडे, राजू झाडे, मुन्ना गटलेवार, ज्येष्ठ नेते जयराम चलाख आदी उपस्थित हाेते.