दोन लाईनमनवर ९० गावांचा भार

By Admin | Updated: May 7, 2015 01:13 IST2015-05-07T01:13:52+5:302015-05-07T01:13:52+5:30

स्थानिक महावितरणच्या कनिष्ठ अभियंता कार्यालयात एका कनिष्ठ अभियंत्यासह दोन लाईनमन कार्यरत आहेत.

Loads of 90 villages on two lines | दोन लाईनमनवर ९० गावांचा भार

दोन लाईनमनवर ९० गावांचा भार

धानोरा : स्थानिक महावितरणच्या कनिष्ठ अभियंता कार्यालयात एका कनिष्ठ अभियंत्यासह दोन लाईनमन कार्यरत आहेत. या कार्यालयांतर्गत ९० गावांचा समावेश आहे. दोन लाईनमनला ९० गावातील वीज व्यवस्था सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी वीज पुरवठा दुरूस्तीच्या कामात प्रचंड दिरंगाई होत असल्याने तालुक्यातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे.
तालुक्यातील धानोरा, येरकड, मोहली, काकडयेली येथील लाईनमनची इतरत्र बदली झाली आहे. त्यामुळे धानोरा कनिष्ठ अभियंता कार्यालयांतर्गत आठ लाईनमन कमी झाले आहेत. मात्र रिक्त झालेल्या जागेवर एकाही लाईनमनची नियुक्ती करण्यात आली नाही. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांना चार ते पाच तास विद्युत लाईनमनची प्रतीक्षा करावी लागली. परिणामी अनेक गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Loads of 90 villages on two lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.